कोंढव्यात पोलिसांचा छापा ; तब्बल 22 लाखांचे हुक्क्याचे साहित्य जप्त, तिघेजण अटकेत

| Updated on: Nov 16, 2021 | 10:40 AM

कोंढव्यातील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या एका गोदामात हुक्क्याचे साहित्य व सुगंधी तंबाखू असल्याची असल्याची टीप पोलिसांनी ना मिळाली. याच टीपच्या आधारे पोलीसांनी छापामारी केली. त्यावेळी त्यांना गोदामात सुंगधी तंबाखू व हुक्क्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले .

कोंढव्यात पोलिसांचा छापा ; तब्बल 22 लाखांचे हुक्क्याचे साहित्य जप्त, तिघेजण अटकेत
सांकेतिक फोटो
Follow us on

पुणे- राज्यात हुक्का पार्लरचे साहित्य विकण्यास बंदी असताना, पुण्यातील कोंढवा परिसरातून हुक्क्याच्या साहित्याचा तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

कोंढव्यातील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या एका गोदामात हुक्क्याचे साहित्य व सुगंधी तंबाखू असल्याची असल्याची टीप पोलिसांना मिळाली. याच टीपच्या आधारे पोलीसांनी छापामारी केली. त्यावेळी त्यांना गोदामात सुंगधी तंबाखू व हुक्क्यासाठी लागणारे साहित्य असा तब्बल 22 लाख 17  हजारांचा मुद्देमाल मिळून आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी शहजाद अश्रफ रंगूनवाला (37), नावेद मुन्ने खान(21)  , शफीक मोहंमद मालापुरी (18) तिघेही लेक डिस्ट्रीक सोसायटी, येवलेवाडी, कोंढवा येथील रहिवाशी आहेत.

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटिंग
दुसरीकडे बिबवेवाडी येथे टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यावर बेटींग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. बिबवेवाडी येथील कोंढवा रोडवरील विष्णु विहार अपार्टमेंटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी निकित अजित बोथरा (26) व ओंकार राजू समुद्रे (25) यांना अटक केली. ओंकार आणि निकेत हे दोघे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल व लॅपटॉवर सट्टा घेताना मिळून आले. कारवाई वेळी पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप असा एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्यासह इतर पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा

VIDEO | चुलत भावाची चूक जीवावर बेतली, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

पिंपरीतून 2 लाखांचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

‘चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले’, भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले