AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | चुलत भावाची चूक जीवावर बेतली, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरामध्ये घडलेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राम बाळासाहेब बागल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO | चुलत भावाची चूक जीवावर बेतली, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू
Pimpari chinchwad Accident
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 16, 2021 | 9:19 AM
Share

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरामध्ये घडलेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राम बाळासाहेब बागल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर राजेंद्र बागल, सुरज जगन्नाथ घुले, सुमित कालिदास परांडे यांच्यासह एका अनोळखी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत राम बागल आणि किशोर बागल हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरुन जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बुलेट विरुद्ध दिशेने नेली. रस्त्यात विरुद्ध दिशेला आरोपी सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली. त्यामुळे बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम रस्त्यावर पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने राम याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झालीये.

दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर मोदलपाडा गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या :

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Jodhpur Car Accident | भरधाव कारने आठ जणांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती