AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले’, भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले

2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका.

'चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले', भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले
ajit pawar
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 2:27 PM
Share

पुणे – आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी तसेच कामाचा उरक असलेला राजकीय नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. कामात कूचराई करणाऱ्यांची ते गय करत नाहीत. पुढचा मागचा विचार न करता थेट कान उघडणी ते करतात. मास्क वापरासाठी रोहित पवारांच्या कानपिचक्या काढल्यानंतर आता बारामतीतील DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले आहे. बारामतीतील एका कार्यक्रमातील जाहीर सभेत त्यांनी ” तुम्ही चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले.” या शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

तर झालं अस की, बारामती तालुक्यातील कुठल्यातरी गावात अवैधरित्या दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अजित पवारांना निवेदन दिले. या निवेदनात संबधीत महिलेचा पती दारू पिऊन घरी त्रास देत असल्याची, मारहाण करत असल्याची माहिती देत आपली व्यथा मांडली होती. तसेच दारू बंदी करण्याची विनंतीही केली होती.

अडचण काय आहे? अजित पवारांनी भर सभेत महिलेचे हेच निवेदन हातात धरत अधिकाऱ्याला खडसावले. ते म्हणाले ‘DYSP इथे दारूबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आले आहे. 2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका. मी तुम्हाला चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले होते.

अवैध धंद्यावर कारवाई करा

बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारूविक्री, हातभट्टी कायमची बंद करा, जी कारवाई करायची असेल ती करा. असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भर सभेत दिलेल्या सूचना अधिकारीवर्गात चर्चा विषय ठरला.

हे ही वाचा 

दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’

शिवशाहीर पुरंदरे यांनीBabasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले? 

छत्रपतींच्या इतिहासासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.