दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’

पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरच्या समन्वयाचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेंटर द्वारे विद्यार्थ्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार 'मोफत कोचिंग सेंटर'
पुणे महानगरपालिका

पुणे- शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोचिंग सेंटरद्वारे केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने महानगरपालिका हे कोचिंग सेंटर चालवणार आहे. या सेंटरमधून यूपीएससी व एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर 17 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण 150 विद्यार्थ्यांना या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. मोफत कोचिंग सेंटरच्या या प्रस्तवाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्य मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या सेंटरमध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने याने यांनी दिली आहे.

एवढ्या मुलांना मिळेल प्रवेश

  • एकूण 150 विद्यार्थ्यांची बॅच असेल.
  • यात राखीव गटातून 100 विद्यार्थी
  • खुल्या गटातून 50  विद्यार्थी निवडणार
  • विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे

पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरच्या समन्वयाचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेंटर द्वारे विद्यार्थ्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील विशेषतः आर्थिकदृटया दुर्बला घटकातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न घेता गरजू विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने ए अभ्यास करू शकणार आहेत. सेंटरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खालील सुविधा मिळणार आहेत. इतकच नव्हेतर प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित विद्यार्थ्याची आर्थिक स्थितीही तपासली जाणार असल्याचे माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या सुविधा मिळणार

  • पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
  • मुलाखतीचे कौशल्य व गटचर्चांचं आयोजन
  • सराव परीक्षा व मुलाखतीची सर्व तयार करून घेतली जाणार आहे.

हेही वाचा

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!

औरंगाबादः लेबर कॉलनीत कारवाईला तूर्त ब्रेक, पाडापाडीसाठी 17 पथके, वाचा कोणाची काय जबाबदारी?

शरद पवारांना शिक्षण खातं अवघड जागेचं दुखणं का वाटलं?, चव्हाणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा?; असा किस्सा जो कुणालाच माहीत नाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI