AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः लेबर कॉलनीत कारवाईला तूर्त ब्रेक, पाडापाडीसाठी 17 पथके, वाचा कोणाची काय जबाबदारी?

त्रिपुरा तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लेबर कॉलनीतील पाडापाडीची कारवाई तूर्तास रोखण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.

औरंगाबादः लेबर कॉलनीत कारवाईला तूर्त ब्रेक, पाडापाडीसाठी 17 पथके, वाचा कोणाची काय जबाबदारी?
पाडापाडीची कारवाई होणार असल्याने लेबर कॉलनीतील नागरिक तणावाखाली
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 1:00 PM
Share

औरंगाबादः शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय (Collector office, Aurangabad) परिसरातील विश्वास नगर- लेबर कॉलनीतील घरे पाडण्यावर प्रशासन ठाम असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे 17 पथकांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी 17 पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यात प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या. सोमवारी किंवा मंगळवारी ही कारवाई होणार होती, मात्र त्रिपुरातील कथित हिंसाचार प्रकरणानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती (Aurangabad police) गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील वातावरण बिघडू नये, यासाठी ही कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे.

रविवारी बैठक,  तूर्त थांबण्याचा निर्णय

रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लेबर कॉलनीतील पाडापाडी संदर्भात बैठक झाली.  यात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजुल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंदार वैद्य, पोलीस उप अधीक्षक उज्वला बनकर तसेच मनपा, बांधकाम, तहसील कार्यालय, घाटी, खनिकर्म, महावितरण, बीएसएनएल आदी विभागांतील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी कॉलनीवर हतोडा पडण्यापासून तुमचा बचाव करू असे आश्वासन दिले असले तरीही कॉलनीत राहणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे, त्याच्या निराधार कुटुंबानाच घर मिळवून दिले जातील, अशी स्थिती आहे. तसेच त्रिपुरा तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लेबर कॉलनीतील पाडापाडीची कारवाई तूर्तास रोखण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.

विशेष पथकांकडे कारवाईची जबाबदारी-

  • महावितरण- लेबर कॉलनीतील वीजपुरवठा खंडित करून यंत्रसामग्री, मालमत्ता हलवणे
  • बीएसएनएल- फोन लाइन खंडित करून यंत्रसामग्री, मालमत्ता सुरक्षित स्थळी हलवणे
  • मनपा- पाणीपुरवठा खंडित करणे
  • शहर पोलीस- कारवाईच्या वेळी या भागातील सार्वजनिक वाहतूक दुसरीकडे वळवणे
  • घाटी- आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वॉर्ड सज्ज ठेवणे
  • सार्वजनिक बांधकाम विभाग- लेबर कॉलनीत रहात असलेल्या नागरिकांना घराबाहेर काढून इमारतींचा ताबा घेणे
  • आरटीओ- कारवाईसाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे
  • तहसीलदार- पंचनाम्याची जबाबदारी खुलताबाद कन्नड, तर शोधपथकाची जबाबदारी वैजापूर, गंगापूर तहसीलदारांवर
  • नगर परिषद कन्नद- रहिवाशांकडून प्राप्त अर्जांची छाननी मुख्याधिकारी करतील.
  • आपत्ती व्यवस्थापन/ अग्निशमन विभागः बचाव साहित्य उपलब्ध करून देणे
  • ग्रामीण पोलीस- प्रतिबंधात्मक आदेश काढणे, पथकांती लोकांना सुरक्षा पुरवणे
  • निवडणूक विभाग- चित्रीकरणासाठी कॅमेरे उपलब्ध करून देणे
  • पुरवठा अधिकारी- पथखासाठी पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करणे
  • कामगार विभाग- मजूर हमाल पुरवणे

इतर बातम्या-

धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.