आधी आमचं लग्न लावून द्या..प्रियकर-प्रेयसीचं शोले स्टाइल आंदोलन, बीडमध्ये 10 तास फुल्ल ड्रामा!

शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नगरसेवकही आले. बघ्यांची गर्दी जमली. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली. तरीही हे युगुल रात्री दहा वाजेपर्यंत खाली आले नाही.

आधी आमचं लग्न लावून द्या..प्रियकर-प्रेयसीचं शोले स्टाइल आंदोलन, बीडमध्ये 10 तास फुल्ल ड्रामा!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:15 PM

बीडः कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या मागणीसाठी बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील (Beed Drama) एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. परवानगी दिली तरच खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ माजली. सुमारे 10 तास हा ड्राम चालला. पोलिसांनी (Beed police) समजूत काढल्यानंतर हे प्रकरणी रात्री उशीरा निवळले.

हिंगोलीत सूत जुळले, बीडमध्ये घटना

बीड शहरातील तरुण हा काही कामानिमित्त हिंगोलीत काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, याची माहिती कुटुंबियांना झाली. महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र ती पतीपासून दूर राहते. यामुळे मुलाच्या कुटुंबियांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधण्यात आले. दरम्यान रविवारी, हिंगोलीहून महिला बीडमध्ये आली. त्यानंतर हा सर्व ड्रामा सुरु झाला.

दुपारी साडे बारा वाजता सुरु झाला ड्रामा

दुपारी बारा वाजेपनंतर तरुण आणि महिला बीड शहराती अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो, असे म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर ठिय्या मांडला. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नगरसेवकही आले. बघ्यांची गर्दी जमली. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली. तरीही हे युगुल रात्री दहा वाजेपर्यंत खाली आले नाही.

मारहाणीच्या भीतीने टाकीवरून उतरेचनात…

सुरुवातीला लग्नाची मागणी मान्य करण्यासाठी हे प्रेमी युगूल टाकीवर चढून बसले होते. मात्र ही मागणी मान्य केल्यानंतरही त्यांना खाली येण्यास भीती वाटत होती. टाकीच्या खाली झालेली गर्दी पाहून आपण खाली आलो तर मारहाण होईल, या भीतीने युगूल खाली येतच नव्हते. अखेर मोबाइलवर फोन करून त्यांची समजूत काढण्यात आली.

इतर बातम्या-

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…

Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.