औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…

औरंगाबादः घरात लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, त्यामुळे समाजात बदनामी होणार, या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. विशेष म्हणजे बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले की, मुलीला पुन्हा घरात घेून का.. या घटनेमुळे […]

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 11:16 AM

औरंगाबादः घरात लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, त्यामुळे समाजात बदनामी होणार, या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. विशेष म्हणजे बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले की, मुलीला पुन्हा घरात घेून का.. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad city) हळहळ व्यक्त होत आहे.

पाच दिवसांवर आले होते लग्न

वाहनचालक असलेल्या 48 वर्षीय गृहस्थाने आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. कुटुंबाची बदनामी होईल, या कारणास्तव कुणाचेचे नाव या वृत्तात देण्यात आलेले नाही. सदर गृहस्थाच्या घरात 19 नोव्हेंबर रोजी मुलीचे लग्न ठरले होते. मात्र मुलीचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, याची माहिती वडिलांना नव्हती. ते मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत होते. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुलगी घर सोडून निघून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर हताश वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ऐन लग्न तोंडावर आल्यावर मुलीने उचललेल्या पावलामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. हा धक्का सहन न झाल्याने बापाने शनिवारी रात्री थेट संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.

चिठ्ठीत लिहिलं..तिला घरात घेऊ नका

जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली. मृताच्या पँटच्या खिशात त्यांचा एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात स्थान नाही’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती.

इतर बातम्या-

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.