AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona | मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त शेखर गायकवाड

पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर हा सरासरी 5.5 टक्के इतका आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या ही जवळपास 10 हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज पुणे आयुक्तांनी वर्तवला आहे.

Pune Corona | मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त शेखर गायकवाड
| Updated on: May 09, 2020 | 7:25 PM
Share

पुणे : पुण्यात गेल्या सात दिवसात सलग पन्नासपेक्षा (Pune Corona Virus Cases Update) जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनाबाधितांची संख्या सरासरी शंभरने वाढत आहे. आज (9 मे) सकाळपर्यंत पुण्यात एकूण 137 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर हा सरासरी 5.5 टक्के इतका आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या ही जवळपास 10 हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड (PMC Commissioner Shekhar Gaikwad) यांनी (Pune Corona Virus Cases Update) व्यक्त केला आहे.

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 247 इतकी आहे, तर जिल्ह्यात 2 हजार 572 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत 20 हजार 270 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय आहे. मे अखेरपर्यंत फक्त पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही 10 हजाराच्या जवळपास पोहोचलेली असेल, असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.

पेठांमधील भाग हा पत्रे लावून पूर्णतः सील

दुसरीकडे, पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुन्हा एकदा पुण्यात दाखल झालं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना या पथकाने दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही हॉटस्पॉट असलेल्या भागात नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पेठांमधील भाग हा आता पत्रे (Pune Corona Virus Cases Update) लावून पूर्णतः सील करण्यात आलाय.

अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा इशारा

कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असताना काही भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिक विरोध करत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी औंध, बोपोडी, कात्रज, मुंढवा या स्मशानभूमीतील विद्युत आणि गॅस दाहिनी राखीव ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पीपीई किट देखील देण्यात आल्या आहेत. अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

दाटलोकवस्ती पुण्यातील कोरोना संसर्गाचं प्रमुख कारण

दाटलोकवस्ती हे पुण्यात कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण आहे. त्याबरोबर प्रसाशकीय पातळीवर घेतल्याजाणाऱ्या निर्णयात आणि दिल्या जाणाऱ्या आदेशात सुसूत्रता नसल्याने कोरोना आटोक्यात आणायला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी कोरोनाचं गांभीर्य (Pune Corona Virus Cases Update) लक्षात घेण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला

CORONA BCG vaccine | देशातील पहिली बीसीजी लस चाचणी पुण्यात, ससून रुग्णालयाला मान्यता

पुण्यात अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिन्या राखीव, अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर गुन्हा

Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाच दिवसांवरुन 10 दिवसांवर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.