पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एका रात्रीत 68 रुग्णांची वाढ

| Updated on: May 03, 2020 | 10:26 AM

आज त्यात 68 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 980 वर पोहोचला (Pune district Corona Update) आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एका रात्रीत 68 रुग्णांची वाढ
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune district Corona Update) आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 980 वर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात एका रात्रीत तब्बल 68 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

पुणे जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात (Pune district Corona Update) आज (3 मे) सकाळी 9 पर्यंत 68 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 62 जणांचा रिपोर्ट हा काल (2 मे) मध्यरात्री आला आहे. तर 6 जणांचा रिपोर्ट नुकताच प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे.

पुणे जिल्ह्यात कालपर्यंत 1912 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आज त्यात 68 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 980 वर पोहोचला आहे.

पुणे जिल्ह्यात 103 कोरोनाबळी गेले आहेत. दरम्यान यात पुणे शहरात नेमके किती रुग्ण वाढले आहेत हे अद्याप समोर आलेले नाही.

तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये आज 17 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे काल (2 मे) 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांचा आकडा 273 वर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार पार

महाराष्ट्रात काल (2 मे) दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, काल राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त काल दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, आणखी 17 जण पॉझिटिव्ह

नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, शहरातील बाधितांचा आकडा 289 वर