Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, आज राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 11:00 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (2 मे) दिवसभरात 790 नव्या (Corona Victims In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, आज राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी (Corona Victims In Maharashtra) सोडण्यात आलं आहे.

36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 521 वर

आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 521 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. आज मुंबईत 27 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यातील 1, औरंगाबादमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 28 पुरुष, तर 8 महिला आहेत. आजच्या 36 मृत्यूंपैकी 19 रुग्ण हे 60 वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील आहेत. तर 16 रुग्ण वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. एक जण 40 वर्षांखालील आहे. या 36 रुग्णांपैकी 23 जणांमध्ये (70 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. तर 3 जणांची इतर आजाराबद्दलची (Corona Victims In Maharashtra) माहिती नाही.

1, 61, 092 नमुन्यांच्या कोरोना चाचणी

आत्तापर्यंत राज्यभरात एकूण 1 लाख 61 हजार 092 नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या. त्यापैकी 1 लाख 48 हजार 248 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर, 12 हजार 296 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 74 हजार 933 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 12 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 10 हजार 513 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 44.40 लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण (Corona Victims In Maharashtra) केलं.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

सिमेंट मिक्सरमध्ये तब्बल 18 जण, घर गाठण्यासाठी मजुरांचा जीवघेणा प्रवास

नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, एका डब्ब्यात 54 प्रवासी

नांदेडचा गुरुद्वारा परिसर कंटेन्मेंट झोन, 20 जणांना कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.