नांदेडचा गुरुद्वारा परिसर कंटेन्मेंट झोन, 20 जणांना कोरोनाची लागण

नांदेडच्या लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात 20 जणांना कोरोनाची लागण झाली (Nanded Corona Positive Patient) आहे.

नांदेडचा गुरुद्वारा परिसर कंटेन्मेंट झोन, 20 जणांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 2:05 PM

नांदेड : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Nanded Corona Positive Patient) आहे. नांदेडच्या लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पंजाबमधून आलेल्या चार वाहन चालकांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.

पंजाबहून नांदेडमध्ये आलेल्या चार वाहन चालकांना कोरोनाची लागण झाली (Nanded Corona Positive Patient) होती. यानंतर प्रशासनाने गुरुद्वारा परिसरात 97 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या होत्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी होणार आहे.

दरम्यान या 20 जणांना नेमकी कोरोनाची लागण कुठून झाली याबाबत शोध सुरु आहे. विशेष म्हणजे या परिसरात राहून पंजाबमध्ये गेलेल्या अनेक भाविकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव इथे नेमका झाला कसा याचा शोध घेण्यात येत आहे.

नांदेडमध्ये नियमित देशभरासह विदेशातून शीख भाविक येत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक भाविक नांदेडमध्ये अडकले होते. त्यामुळे लॉकडाऊन होण्यापूर्वी कोण कोण विदेशी पर्यटक नांदेडला येऊन गेले. त्याचा शोध आता सुरु आहे.

दरम्यान आज हे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने गुरुद्वारा परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर केलं आहे. चिखलवाडी, बडपुरा आणि शहीदपुरा या भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच या सगळ्या भागात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते (Nanded Corona Positive Patient) आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार पार 

महाराष्ट्रात काल (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  (Aurangabad Corona Patient Increase) दिली.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.