AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 338 ग्रामपंचायतींकडून ‘रोहयो’ची कामे, तर 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील  338 ग्रामपंचायतींनी 696 कामे सुरु केली आहेत. यामुळे 4041 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. (Pune Employment Guarantee Scheme Work Begins amid Corona Lockdown)

पुण्यात 338 ग्रामपंचायतींकडून 'रोहयो'ची कामे, तर 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 19, 2020 | 8:03 AM
Share

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगाराअभावी मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतींनी कामे सुरु केल्याने जवळपास चार हजार मजुरांना रोजगार मिळणार आहे.  पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे साडेतीन हजार तर पुणे जिल्ह्यात 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु झाल्याची माहिती आहे. (Pune Employment Guarantee Scheme Work Begins amid Corona Lockdown)

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील  338 ग्रामपंचायतींनी 696 कामे सुरु केली आहेत. इंदापूरमध्ये 128, जुन्नरमध्ये 92, भोरमध्ये 85, मावळमध्ये 76, शिरुरमध्ये 75, तर बारामतीमध्ये 71 कामांना सुरुवात झाली आहे. यामुळे 4041 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

पुणे जिल्ह्याचा रोजगार हमी योजनेचा सुमारे 106 कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 25 हजार कामे प्रस्तावित आहेत.

निम्मी कामे ग्रामपंचायतींमार्फत तर उर्वरित अर्धी कामे राज्य सरकारच्या अन्य विविध यंत्रणांमार्फत केली जाणार आहेत. यानुसार ग्रामपंचायतींमार्फत वर्षभरात सुमारे साडेबारा हजार कामे केली जाणार आहेत. या कामांच्या माध्यमातून 60 हजार मजुरांना काम मिळू शकणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सुरु असलेल्या कामांची तालुकानिहाय संख्या

आंबेगाव – 33 बारामती – 71 भोर – 85 दौंड – 43 हवेली – 13 इंदापूर- 128 जुन्नर – 92 खेड – 43 मावळ – 76 मुळशी – 05 पुरंदर – 21 शिरुर – 75 वेल्हे – 13

पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे साडेतीन हजार तर पुणे जिल्ह्यात 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु झाले आहे. मात्र कच्च्या माल आणि कामगारांची वाहतूक ही सर्वच कंपन्यांपुढे अडचण आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमध्ये असल्यामुळे दोन्ही शहरांतील कंपन्या यापूर्वी सुरु झाल्या नव्हत्या.

उद्योग विभागाच्या पुढाकारामुळे पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांचे कामकाज सुरु करण्यास राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्योग संचालक कार्यालयाने तेथील 3 हजार 500 कंपन्यांना तर जिल्ह्यातील 17 हजार 30 कंपन्यांना उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

टाटा मोटर्स, पद्मजी पेपर मिल, थॅरमॅक्स, एसकेएफ बेअरींग आदी कंपन्यांचेही काम सुरु झाले आहे. येत्या आठ दिवसांत पुणे शहर वगळता जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना वेग येणार आहे. उद्योग विभागाचे विभागीय सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

(Pune Employment Guarantee Scheme Work Begins amid Corona Lockdown)

Follow Us
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव