लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!

अवैध गुटखा पकडला असता, आरोपी हा चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं आहे. (Pune police constable arrested)

लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 2:33 PM

पुणे : पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचाऱ्याच्या ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं (Pune police constable arrested) उघड झाल्यानंतर, आणखी एक भलताच प्रकार समोर आला आहे. अवैध गुटखा पकडला असता, आरोपी हा चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं आहे. (Pune police constable arrested)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले. अवैद्य गुटखा तस्करी करत असलेल्या वाहनाचा पाठलाग करत असताना, आरोपींनी गाडी जोरात पळवली. त्यावेळी उपस्थित पोलीस आणि होमगार्डने थेट गाडीवर लाठीहल्ला करुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या स्विफ्टमधून ही अवैध गुटखा वाहतूक केली जात होती.

नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना पकडल्यानंतर, भलताच प्रकार समोर आला. पोलिसांनी किशोर धवडे आणि हानिफ तांबोळी यांना ताब्यात घेतलं. हे दोघेही शिरुरचे रहिवासी आहेत. अधिक चौकशीनंतर किशोर धवडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार असल्याचं उघड झालं. पोलिसानेच हे अवैध कृत्य केल्याने पुणे पोलीस दलात एकच चर्चेचा विषय ठरला. या घटनेची गंभीरपणे दखल घेत, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलीस हवालदाराला तत्काळ बडतर्फ केले.

मनपा कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे (Pune youth arrested for carrying Ganja drug). या लॉकडाऊनमुळे अनेकजण आपली गैरसोय होत असल्याची तक्रार करत आहेत. यामध्ये अनेक बेवडे आणि व्यसनी लोकांचं प्रमाण अधिक आहे. पुण्यात तर एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. (Pune youth arrested for carrying Ganja drug) पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या 

मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणायला, पुण्यातील धक्कादायक चित्र, लॉकडाऊनमध्येही गांजा विक्री

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.