AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी

राज्यात आतापर्यंत 17 पोलिसांचा मृत्यू 'कोरोना'ने बळी घेतल्याची माहिती आहे.. (Pune Traffic Police Corona Death)

एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा 'कोरोना'ने बळी
| Updated on: May 21, 2020 | 4:02 PM
Share

पुणे/मुंबई : एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी गेला. पुण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त सकाळी आलं, तर मुंबईतही तिघा पोलिसांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले. (Pune Traffic Police Corona Death)

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना संबंधित वाहतूक पोलिसाची प्राणज्योत मालवली. आतापर्यंत पुण्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकूण 26 पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तेरा जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, तर अकरा जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी फरासखाना पोलीस स्थानकातील सहाय्यक फौजदाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे ‘कोरोना’मुळे दुर्दैवी निधन झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. 

(Pune Traffic Police Corona Death)

मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे हेड कॉन्स्टेबलही कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.

राज्यात कालच्या दिवसात 60 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. कालपर्यंत 1388 पोलीस कोरोनाग्रस्त होते. यामध्ये 142 अधिकारी आणि 1246 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आतापर्यंत 17 पोलिसांचा मृत्यू ‘कोरोना’ने बळी घेतल्याची माहिती आहे. (Pune Traffic Police Corona Death)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.