AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्या प्रकरण : फरार आरोपी बाळ बोठेंचा जामिनासाठी अर्ज; सुनावणी लांबणीवर

फरार असलेल्या बाळ बोठे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

रेखा जरे हत्या प्रकरण : फरार आरोपी बाळ बोठेंचा जामिनासाठी अर्ज; सुनावणी लांबणीवर
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 3:45 PM
Share

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. फरार असलेल्या बाळ बोठे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज दुपारी यावर सुनावणी होणार होती. पण आता शुक्रवारी 11 डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Rekha Jare murder accused Bal Bothes hearing on bail application extended on 11 december)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. दुपारी दोननंतर होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. खरंतर, राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकऱ्यांना पकडले होते. मारेकऱ्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. अशात पोलिसांकडून बोठे यांच्या घरावर धाडही टाकण्यात आली होती.

कोण आहे बाळासाहेब बोठे?

बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी देखील बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचाही एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (Rekha Jare murder accused Bal Bothes hearing on bail application extended on 11 december)

संबंधित बातम्या :

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

(Rekha Jare murder accused Bal Bothes hearing on bail application extended on 11 december)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...