AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात ऑडिटर ठार, नांगरे-पाटील घटनास्थळी

नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झाला.

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात ऑडिटर ठार, नांगरे-पाटील घटनास्थळी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 14, 2019 | 2:55 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झाला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने हा गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला आहे. तर वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. चोरट्याने राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

नाशिकच्या उंटवाडी परिसरात मुथूट फायनान्स कंपनी आहे. यावर सकाळी सकाळीच दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. या फायरिंगमध्ये तीन जण जखमी झाले. यामध्ये वॉचमन आणि ऑडिटसाठी दक्षिणेकडून आलेल्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणलं होतं, मात्र त्यांचा  मृत्यू झाला.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रं फिरवली आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. संपूर्ण शहर या प्रकाराने हादरलं आहे.

IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीनंतर नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी भावना नाशिककरांची होती. मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस प्रशासनावर नाशिककर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

नाशिक शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडतो आहे. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शहरातील गुंडांची मजल आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत पोहचली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला, तर चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवरील हल्ले अशा घटना कधी नव्हे त्या शहरात घडत आहेत.

संबंधित बातम्या 

नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?  

नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय 

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक, विश्वास नांगरे पाटलांचा कौतुकास्पद निर्णय  

हेल्मेटसक्ती : 18-35 वयोगट टार्गेट, ते कर्ते पुरुष असतात : विश्वास नांगरे पाटील 

दृश्यम चित्रपट पाहून खूनाचा कट, विश्वास नांगरे पाटलांकडून पर्दाफाश

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?