Saaho Review : समीक्षकांकडून दीड ते अडीच स्टार, प्रभासचे चाहते मात्र साहो पाहून खूश

| Updated on: Aug 30, 2019 | 1:25 PM

‘बाहुबली’ अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा साहो (Saaho) रिलीज झाला आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमाची चाहते अक्षरश: वाट पाहात होते.

Saaho Review : समीक्षकांकडून दीड ते अडीच स्टार, प्रभासचे चाहते मात्र साहो पाहून खूश
Follow us on

Saaho Review मुंबई : ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा साहो (Saaho) रिलीज झाला आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमाची चाहते अक्षरश: वाट पाहात होते. सुजीत के यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

प्रभासच्या चाहत्यांनी या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. मात्र समीक्षकांनी सिनेमाचं अजिबात कौतुक केलेलं नाही. उलट समीक्षकांनी या सिनेमाला अत्यंत कमी स्टार दिले आहेत.

जे अॅक्शन लवर्स आहेत, त्यांना तर हा सिनेमा खूपच भावला आहे. अॅक्शन सीन्स, व्हीएफएक्सपासून प्रभासच्या चाहत्यांचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाची अक्षरश: चिरफाड केली आहे.

तरण आदर्श यांनी साहोला केवळ दीड स्टार दिला आहे. प्रतिभेचा, मोठ्या पैशाचा आणि संधीचा कचरा झाला. कमकुवत कथा, गोंधळात टाकणारी पटकथा आणि अपरिपक्व दिग्दर्शन अशा शब्दात तरण आदर्श यांनी या सिनेमाची चिरफाड केली आहे.

एकवेळ पाहण्यासारखा सिनेमा

समीक्षक रमेश बाला म्हणतात, “प्रभासने सर्वोत्तम भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने समाधानकारक काम केलं. श्रद्धा कपूरनेही चांगलं काम केलं आहे. एकवेळ पाहण्यासारखा सिनेमा आहे”

चाहत्यांकडून भरभरुन कौतुक

एकीकडे सिनेसमीक्षक साहोची चिरफाड करत असले, तरी प्रभासचे चाहते मात्र त्याचं कौतुक करत आहेत. एका युजरने ट्विट करताना इतरांच्या खोट्या रिव्ह्यूवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. हा आजपर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे, असं चाहत्याने म्हटलं आहे.

साहो 

तेलुगु सिनेसृष्टीचे प्रसिद्ध लेखक, निर्माते सुजीत रेड्डी यांनी साहो सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. साहो या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, यांच्यासह अभिनेता नील नितीन मुकेश,  जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकार आहेत. यूवी क्रिएशन प्रोडक्शन आणि टी-सीरीज यांनी मिळून हा चित्रपट तयार केला आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे.

‘साहो’ हा चित्रपट मूळ तामिळ भाषेसह हिंदी, मल्याळम आणि तेलुगू या भाषांमध्ये आहे. या सिनेमाचं शूटिंग अबूधाबी, रोमानिया, हैद्राबाद आणि मुंबईसह अनेक ठिकाणी झालं आहे. हा सिनेमा जवळपास 3 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला बंपर ओपनिंग मिळून कमाईचे रेकॉर्ड मोडेल असा विश्वास ट्रेड समीक्षकांनी व्यक्त केला आहे.