AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणि साताऱ्यात मामा-भाची बुडतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला…

32 वर्षीय निकिता अजय पुनदीर आणि 45 वर्षीय मामा उदय जगन्नाथ पवार या दोघांचा कण्हेर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आणि साताऱ्यात मामा-भाची बुडतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला...
| Updated on: Dec 15, 2019 | 10:40 AM
Share

सातारा : साताऱ्यातील कण्हेर धरण परिसरात सहकुटुंब फिरायला गेलेल्या मामा-भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी घडली. धरणात डुंबतानाचा व्हिडीओ काढण्याच्या प्रयत्नात मामा-भाची बुडतानाचा दुर्दैवी क्षण कॅमेरात कैद (Satara Uncle Niece Drown Video) झाला.

32 वर्षीय निकिता अजय पुनदीर आणि 45 वर्षीय मामा उदय जगन्नाथ पवार या दोघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. साताऱ्यातील वेळेकामथीमधील दत्तजयंतीच्या यात्रेनिमित्त मामा-भाची कुटुंबियांसह आले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पवार आणि पुनदीर कुटुंब कण्हेर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले.

घरातील नातेवाईकांनी दोघं धरणात जात असतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे घडणारं आक्रितही कॅमेरात नकळत कैद होईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसेल.

सुरुवातीला निकीता आणि मामा धरणाच्या पाण्यात उतरत असताना आजूबाजूचे मजामस्तीचे आवाज ऐकू येत होते. परंतु कुटुंबाच्या डोळ्यादेखत मामा-भाची पाण्यात बुडताना पाहून सदस्यांनी एकच आरडाओरड केली. परंतु काही क्षणातच दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. त्यानंतर धरणाच्या किनाऱ्यावरी कुटुंबीयांचा आक्रोश आणि किंकाळ्या व्हिडीओत ऐकायला येतात.

या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वेळेकामथी येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, महिलेच्या पती-पुतण्यासह चौघे अटकेत

महाबळेश्वर ट्रेकर्स आणि परिसरातील युवकांनी धरणात उतरुन शोध मोहीम घेतली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह बिलगलेल्या अवस्थेत दिसून आले.

दोन्ही मृतदेह बाहेर काढताना निकिता मृतदेह घसरुन खोल पाण्यात गेल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम (Satara Uncle Niece Drown Video) सुरुच होती. निकिता पुनदीर ही मूळ उत्तराखंडची असून ती सध्या मुंबईत स्थायिक झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.