AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शरद केळकरच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' सिनेमाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान, एक किस्सा घडला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरसाठी टाळ्या वाजवल्या.

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शरद केळकरच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट
| Updated on: Nov 19, 2019 | 10:22 PM
Share

मुंबई : अभिनेता अजय देवगण याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर रिलीज झाला (Tanhaji: The Unsung Warrior trailer) आहे. यामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाची स्टारकास्ट ट्रेलर रिलीजवेळी उपस्थित होती. मात्र, या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान, एक किस्सा घडला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरसाठी टाळ्या वाजवल्या (Sharad Kelkar corrects Reporter).

आज या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर अजय देवगण (Ajay Devgan), शरद केळकर (Sharad Kelkar), सैफ अली खान (Saif Ali Khan), दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना या सिनेमाबाबत विचारण्यात आलं. या सिनेमात अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे शरद केळकरला शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, हा प्रश्न विचारताना पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरने त्यांची चूक सुधारत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं म्हणायला सांगितलं. शरद केळकरने पत्रकाराची चूक सुधारताच त्याच्या मनातील शिवाजी महाराजांबाबतचा आदर पाहून सर्वच आवाक झाले. शरद केळकरसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

या घटनेचा व्हिडीओ मराठी रिट्विटच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. त्यासोबत ‘हे जपलं पाहिजे, वाढविले पाहिजे’, असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. यामध्ये सर्वचजण शरद केळकरचं कौतुक करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्याकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने त्यांच्या या चुकीसाठी सपशेल माफी मागितली. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केल्यामुळे (Sony TV on KBC11 Shivaji Maharaj Row) सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.