AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 जून) आपल्या कोकण दौऱ्याला रायगडपासून सुरुवात केली आहे (Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad).

शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर
| Updated on: Jun 09, 2020 | 4:58 PM
Share

रायगड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 जून) आपल्या कोकण दौऱ्याला रायगडपासून सुरुवात केली आहे (Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad). यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतले. त्यांनी माणगाव आणि म्हसळ्यात वादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. म्हसळानंतर ते दिवे आगारकडे रवाना झाले. ते आज दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर अनेक नेते आहेत.

शरद पवार यांनी म्हसळा येथे मदरसा आणि उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती भधुकर गायकर, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत यांनी यावेळी शरद पवार यांच्यासमोर नुकसानीच्या व्यथा मांडल्या.

शरद पवार यांनी या दौऱ्यात निर्माणाधीन खडतर रस्त्यांवरुन प्रवास करत नुकसानीची पाहणी केली. प्रवासादरम्यान त्यांचा ताफा पडलेल्या वीजेच्या तारांवरुनही गेला. माणगाव येथे पहिला टप्पा केल्यावर शरद पवार यांचा ताफा माणगाव ते म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन असा प्रवास करत माणगाव म्हसळा रोडवरील घोणसे घाटातून पुढे गेला. या रोडचं सध्या काँक्रेटिकरण सुरु आहे.

शरद पवार यांच्या दौऱ्यातील प्रमुख घडामोडी:

  • शरद पवार दुपारी 12.30 वाजता माणगाव मार्केटला आले. तिथं त्यांनी नुकसानीची पाहणी केली.
  • दुपारी 1 वाजता त्यांनी म्हसाळा येथील मदरशाला भेट दिली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेडचं नुकसान झालं होतं. शेडची पाहणी करुन स्थानिकांकडून माहिती घेतली.
  • दुपारी 1.15 ला म्हसाळा येथील रुग्णालयाची पाहणी केली. वादळामुळे तिथेही मोठं नुकसान झालं होतं.
  • दुपारी 1.45 च्या दरम्यान त्यांनी दिवे आगार येथील गिरीराज बापट यांच्या चिकू, नारळ बागेची पाहणी केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
  • रस्त्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं दिसून आलं. तसेच वीजेचे खांबही पडल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या :

Live Update : शरद पवार यांचा दिवेआगरमधील शेतकऱ्यांशी संवाद

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.