AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडचणीतील साखर क्षेत्राला आर्थिक मदत द्या, शरद पवारांनी पंतप्रधानांना सुचवले सहा उपाय

'कोविड19'चे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघटनेने काही त्वरित उपाय सुचवले असल्याचं पवारांनी पत्रात नमूद केलं आहे. (Sharad Pawar writes to PM Narendra Modi on sugar industry crisis during lockdown)

अडचणीतील साखर क्षेत्राला आर्थिक मदत द्या, शरद पवारांनी पंतप्रधानांना सुचवले सहा उपाय
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 15, 2020 | 10:45 AM
Share

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. साखर क्षेत्राला आर्थिक मदत करण्यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला सहा उपाय सुचवले आहेत. गेल्या काही दिवसात पवारांनी मोदींना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे. (Sharad Pawar writes to PM Narendra Modi on sugar industry crisis during lockdown)

लॉकडाऊन होण्यापूर्वीच साखर उद्योग संकट असल्याचं पाहून पंतप्रधानांनी काही महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपाययोजना केल्या होत्या. किमान हमीभाव, साखर निर्यात, बफर स्टॉक याबाबत आर्थिक उपाय योजले होते. मात्र ‘कोविड19’चे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघटनेने काही त्वरित उपाय सुचवले असल्याचं पवारांनी पत्रात नमूद केलं आहे.

काय आहेत उपाय?

1. 2018-19 आणि 2019-20 पासून प्रलंबित असलेले निर्यात प्रोत्साहन भत्ते (export incentives) आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी निधीची तरतूद 2. साखरेचा किमान हमीभाव दर्जानुसार 3450 ते 3750 रुपयांच्या श्रेणीत वाढवा 3. मागील दोन वर्षात गाळप केलेल्या ऊसाला सरासरी प्रतिटन 650 रुपये अनुदानाची तरतूद 4. मित्र समितीच्या शिफारशींच्या आधारे खेळत्या भांडवलाच्या (Working capital) थकबाकीचे अल्प मुदतीच्या कर्जात रुपांतरण आणि दोन वर्षांच्या अधिस्थगनासह किंवा व्याज सवलतीसह (moratorium) सर्व मुदतीच्या कर्जाचे दहा वर्षांसाठी रुपांतरण करा 5. साखर कारखानदारांच्या डिस्टिलरीजना सामरिक व्यवसाय एकक (Strategic Business Units- एसबीयू) म्हणून मानले जावे, केंद्र सरकारतर्फे सन 2018 मध्ये जाहीर केलेल्या व्याज सबवेशन कॅपेक्स (Interest Subvention Capex) योजने अंतर्गत मंजूर झालेल्या इथनॉल प्रकल्पांना स्टँड अलोन (एकल) तत्वावर बँकांनी वित्तपुरवठा करावा. (Sharad Pawar writes to PM Narendra Modi on sugar industry crisis during lockdown)

पहिल्या पत्रात (26 एप्रिल) ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत पवारांनी महाराष्ट्राला अतिरिक्त 1 लाख कोटी देण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या पत्रात (3 मे) शरद पवार यांनी ‘आयएफएससी’ केंद्र गांधीनगरमध्ये नेल्याने देशाचे आर्थिक नुकसान तर होईलच, मात्र मुंबईचे महत्त्व कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल, असा इशारा केंद्राला दिला होता.

संबंधित बातम्या :

राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, 10 हजार 500 कोटींचा हप्ता थांबवण्याचीही मागणी

(Sharad Pawar writes to PM Narendra Modi on sugar industry crisis during lockdown)

Follow Us
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....