राखी सावंतकडून लग्नाची पत्रिका शेअर

मुंबई : सतत वेगवेगळ्या वक्तव्यातून चर्चेत राहणारी राखी सावंत सध्या वेगळयाच मुद्दयावरुन चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी राखीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली असून येत्या 31 डिसेंबरला, लॉस एंजेलिस येथे लग्न होणार आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर ही लग्नाची पत्रिका तिने शेअर केली आहे. ती दीपक कलाल सोबत लग्न करणार असल्याचं पत्रिकेतून स्पष्ट होत आहे. […]

राखी सावंतकडून लग्नाची पत्रिका शेअर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : सतत वेगवेगळ्या वक्तव्यातून चर्चेत राहणारी राखी सावंत सध्या वेगळयाच मुद्दयावरुन चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी राखीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली असून येत्या 31 डिसेंबरला, लॉस एंजेलिस येथे लग्न होणार आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर ही लग्नाची पत्रिका तिने शेअर केली आहे. ती दीपक कलाल सोबत लग्न करणार असल्याचं पत्रिकेतून स्पष्ट होत आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंहचे लग्न इटलीत पार पडले. तर आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निकच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. याचदरम्यान कपील शर्मानेही आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता राखीने शेअर केलेल्या लग्न पत्रिकेवरुन पुन्हा ती चर्चेत आली आहे.

कोण आहे दीपक कलाल

राखीने शेअर केलेल्या लग्न पत्रिकेनुसार ती दीपक कलाल सोबत लग्न करणार आहे. दीपक कलालनेही आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे कार्ड शेअर केले आहे. दीपक कलाला सोशल मीडियावर प्रसिद्द आहे. दीपक सतत सोशल मीडियावर आपल्या हटके पोस्ट आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर त्याचा मोठ्या संख्येने चाहता वर्ग आहे. नुकतेच रिएलिटी शो इंडिया गॉट टॅलेंटमध्ये दिसला होता.

मागे राखी सावंत आणि तनुश्री दत्तामध्ये चांगलाच वाद चालू होता. राखी सलग मीटू चळवळीच्या माध्यमातून नाना पाटेकरचा बचाव करत होती. तर नुकतेच ती एका रेसलिंग रिंगमध्ये उतरली होती. जिथे तिला महिला रेसलरचा मार खावा लागला होता. यामुळे तिला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. आता अचानक लग्नाचे कार्ड राखीने शअर केल्यामुळे पुन्हा एकदा राखी चर्चेत आलेली आहे.

View this post on Instagram

??????????????????????

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.