किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड

एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने साईनगरी शिर्डी हादरली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 11:27 AM

शिर्डी : एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने साईनगरी शिर्डी हादरली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या  अर्जुन पन्हाळेने किरकोळ वादातून हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्याकांडात 65 वर्षीय दादा ठाकूर, 60 वर्षीय दगडूबाई ठाकूर आणि 16 वर्षाची खुशी ठाकूर यांचा मृत्यू झाला.

अर्जुन पन्हाळेने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ठाकूर दाम्पत्याचे कोयत्याने गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचीदेखील कोयत्यानं हत्या केली.

अर्जुन पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (वय 35 वर्षे) आणि तावू ठाकूर (वय 18 वर्षे) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.