दुतोंडी साप म्हणजे संजय राऊत!; भाजप नेत्याचा निशाणा, कुणाी डागलं टीकास्त्र?

| Updated on: Mar 05, 2024 | 1:17 PM

Nitesh Rane on Sanjay Raut Loksabha Election 2024 : संजय राऊतांवर भाजप नेत्याचा निशाणा; म्हणाले, दुतोंडी साप म्हणजे संजय राऊत! कुणी केली ही टीका? लोकसभा निवडणुकीवर बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. कुणी केली ही टीका? वाचा...

दुतोंडी साप म्हणजे संजय राऊत!; भाजप नेत्याचा निशाणा, कुणाी डागलं टीकास्त्र?
Follow us on

महेश सावंत, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी सिंधुदुर्ग |05 मार्च 2024 : भाजप नेत्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी? याबाबत संजय राऊतने किती तारखा दिल्या आहे. यांची भांडण कमी होत नाहीत. मतदानानंतर देखील यांची भांडण मिटणार नाहीत. केवळ 5 ते 5 जागा देणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा फार मोठा अपमान आहे. शाहू महाराजांच्या घरात शकुनी मामाने सुरुंग लावला का? याबाबत शाहू महाराज यांचे मत फार महत्वाचं आहे. दुतोंडी साप म्हणजे संजय राऊत!, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

नितेश राणे यांचं टीकास्त्र

काल मोदींजींना भारत देशाचा नागरिक आपला परिवार असल्याची भावना व्यक्त केली. त्यावर टीका करताना राऊत याने अधिकार आहे का? अशी टीका केली. 2019 पर्यँत त्यांनी सुद्धा मोदी परिवाराचा फायदा घेतला आहे. मनात बेईमानी आल्यामुळे आम्ही परिवार नाही असं सांगून वेगळे झाले. संजय राऊतचा मालक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंनी आपला परिवार मानला का? पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कोणाला परिवार मानलं का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

संजय राऊतांवर निशाणा

दिशा सालीयन केस मधून माझ्या मुलाला वाचवा अस सांगत आहेत.अशी टीका करत असताना संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. नेमका संजय राऊत चा परिवार कोणता? भारतीय आहे की रशियात आहे? मणिपूर विषयी बोलण्यापूर्वी पत्राचाळ मधील माणसांना आपला परिवार माना, असा घणाघात नितेश राणे यांनी केलाय.

अमित शाह यांच्या दौऱ्यावर भाष्य

भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तिथे त्यांची सभा होणार आहे. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कोणाला कसा न्याय द्यायचा? हे अमित शाह यांना माहित आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल. दूरदृष्टी असणारा नेता आम्हाला विश्वास आहे. ज्या अडचणी आहेत. त्या दूर होतील, असं नितेश राणे म्हणाले.