पैसे न दिल्याने स्ट्रेचर ढकलण्यास वॉर्ड बॉयचा नकार, सहा वर्षाच्या मुलाने आईसह स्ट्रेचर ढकलले

उत्तर प्रदेशमधील एका रुग्णालयात सहा वर्षाचा लहान मुलगा आईसह स्ट्रेचर ढकलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Small boy pulling stretcher) आहे.

पैसे न दिल्याने स्ट्रेचर ढकलण्यास वॉर्ड बॉयचा नकार, सहा वर्षाच्या मुलाने आईसह स्ट्रेचर ढकलले
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 3:24 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका रुग्णालयात सहा वर्षाचा लहान मुलगा आईसह स्ट्रेचर ढकलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Small boy pulling stretcher) आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील (Small boy pulling stretcher) आहे.

व्हिडीओमध्ये लहान मुलगा आणि त्याची आई आजोबांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले आहेत. यावेळी आजोबांवर उपचार करण्यासाठी त्यांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत आहे. यावेळी आई आणि मुलगा स्वत: स्ट्रेचर ढकलत असल्याचे दिसत आहे.

रुग्णालयातील वॉर्ड बॉयने स्ट्रेचर ढकलण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे तीस रुपये मागितले. नातेवाईकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी स्वत: स्ट्रेचर ढकलला. या वॉर्ड बॉयला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे, असं सांगितले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचताच त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यासोबत त्यांनी रुग्ण छेंदी यादव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आणि तातडीने या प्रकरणाचा अहवाल मला द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

“छेंदी हे गौरा गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला जखम झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची मुलगी बिंदू आणि सहा वर्षाचा नातू होता”, असं रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“वडिलांवर उपचार करण्यासाठी त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले होते. पण या कामासाठी वॉर्ड बॉयने पैसे मागितले. मी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे वॉर्ड बॉयने स्ट्रेचर ढकलण्यास नकार दिला. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला स्ट्रेचर ढकलावा लागला”, असं बिंदूने सांगितले.

बिंदूला माहित नव्हते ती स्ट्रेचर खेचताना कुणीतरी त्यांचा व्हिडीओ काढत आहे. व्हिडीओ काढल्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

“रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी वॉर्ड बॉयला कामावरुन काढून टाकले आणि या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. यापुढे पुन्हा असं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ”, असं रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबईतील ‘नॉन कोव्हिड’ रुग्णांसाठी दिलासा | 26 दवाखाने, 7 रुग्णालये इतरांसाठी खुली

मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट, पालिकेकडून 37 रुग्णालयांना दणका

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....