कोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

कोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन […]

कोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

कोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन मुलांसोबत राहत होत्या. गुरुवारी दिवसभर स्वाती आजूबाजूच्या परिसरात न दिसल्याने शेजारील लोकांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. त्यावेळी दरवाजा उघडताच शेजाऱ्यांना विभावरी (4) आणि शिवांश(1) या दोन चिमुरड्यांचे मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आले. तर त्यांच्या बाजूलाच स्वाती यांचाही मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

स्वाती यांचे पती सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत. पाटील कुटुंबीय अवघ्या वर्षभरापूर्वी नेर्ले गावात राहायला आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी छोटा मुलगा शिवांशचा वाढदिवसही थाटामाटात साजरा केला होता. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या का केली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वाती यांच्या आत्महत्येवरुन माहेरच्यांकडून आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत सध्या पोलिस तपास करीत आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.