AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाने हेडफोन मागवले, अमेझॉनवरुन लोखंडी नळ आला

मुंबई : ऑनलाईन धोका अनेकांना बसल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. पण आता चक्क बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलंय. सोनाक्षी सिन्हाने अमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले होते. पण तिला कुरिअरने चक्क तुटलेल्या नळाचे तुकडे घरी आणून देण्यात आले. सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आणि अमेझॉनकडे तक्रारही केली. सोनाक्षीने 18 हजार रुपयांचे बोसचे […]

सोनाक्षी सिन्हाने हेडफोन मागवले, अमेझॉनवरुन लोखंडी नळ आला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : ऑनलाईन धोका अनेकांना बसल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. पण आता चक्क बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलंय. सोनाक्षी सिन्हाने अमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले होते. पण तिला कुरिअरने चक्क तुटलेल्या नळाचे तुकडे घरी आणून देण्यात आले.

सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आणि अमेझॉनकडे तक्रारही केली. सोनाक्षीने 18 हजार रुपयांचे बोसचे हेडफोन मागवले होते. याबदल्यात तिला लोखंडी नळाचे तुटलेले तुकडे पाठवण्यात आले. तिने यानंतर तक्रारही केली. पण याला अमेझॉनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे सोनाक्षीने यानंतर आणखी एक ट्वीट करत कुणाला नळाचे तुकडे घ्यायचे का, तेही 18000 रुपयांना, अशीही विचारणा केली आणि अमेझॉनलाही सुनावलं.

अमेझॉनच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी सोनाक्षीच्या ट्वीटला रिप्लाय दिला. या चुकीबद्दल अमेझॉन इंडियाने माफी मागितली आणि पुढील मदतीसाठी डिटेल्सचीही मागणी केली.

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा