‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर लॉन्च

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा ट्रेलर लॉन्च

मुंबई : अभिनेता अनुपम खेर यांचा नवा सिनेमा ‘ द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर‘चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या सिनेमात स्वत: अनुपम खेर हे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका निभावत आहेत. विजय रत्नाकर गुट्टे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, हंसल मेहता या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. संजय बारु यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर‘ या […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : अभिनेता अनुपम खेर यांचा नवा सिनेमा द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या सिनेमात स्वत: अनुपम खेर हे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका निभावत आहेत. विजय रत्नाकर गुट्टे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, हंसल मेहता या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. संजय बारु यांच्या द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर हा सिनेमा बेतलेला आहे. येत्या 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

2 मिनिट 43 सेकंदांचा द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमाचा ट्रेलर आहे. अनुपम खेर हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका, तर अभिनेता अक्षय खन्ना हा संजय बारु यांची भूमिका निभावत आहे. मुझे तो डॉ. साहब (मनमोहन सिंह) भीष्म जैसे लगते हैं. जिनमें कोई बुराई नहीं है. पर फैमिली ड्रामा के विक्टिम हो गए. महाभारत में दो फैमिलीज थीं, इंडिया में तो एक ही है. या डायलॉगने या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसह तत्कालीन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिकाही यात आहेत. संजय बारु यांच्या भूमिकेतील अक्षय खन्ना या सिनेमाच कथा सांगताना सिनेमात दिसतात.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर जरी हा सिनेमा बेतलेला असला, तरी सर्वाधिक निशाणा यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर साधला आहे, असे एकंदरीत ट्रेलरवरुन दिसते. त्यामुळे आगामी काळात या सिनेमावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे.

पाहा ट्रेलर :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें