AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : सलग तीन विजयानंतर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या, पुढचं गणित मुंबई ठरवणार

आयपीएल 2024 स्पर्धेत अजूनही प्लेऑफचं गणित सुटलेलं नाही. मुंबई इंडियन्स एकमेव संघ खऱ्या अर्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. तर इतर संघांमध्ये अजूनही जोरदार चुरस दिसत आहे. त्यात राजस्थान रॉयल्स सहज स्थान मिळवणार आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आशाही कायम आहेत.

IPL 2024 : सलग तीन विजयानंतर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या, पुढचं गणित मुंबई ठरवणार
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 05, 2024 | 4:05 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवातीला स्थिती नाजूक होती. मात्र त्यानंतर आरसीबीने चांगलं कमबॅक केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंघळुरुने गुजरात पराभूत करत आपणंही रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात गुजरात टायटन्सने बंगळुरुला चार गडी राखून पराभूत केलं. यासह आरसीबीने गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे. सलग तीन सामन्यात विजय मिळवत बंगळुरुचा संघ सातव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स आणि गुजरातचे प्रत्येक 8 गुण आहेत. मात्र या दोन्ही संघांच्या तुलनेत आरसीबीचा रनरेट चांगला आहे. गुजरातविरुद्धचा सामना कमी षटकात संपवल्याने त्याचा फायदा झाला आहे.गुजरात विरुद्धचा सामना आरसीबीने 38 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केला. आरसीबीचा नेट रनरेट -0.0149 इतका झाला आहे. तर गुजरातचा नेट रनरेट -1.320 इतका आहे.

आतापर्यंत आरसीबीने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवून 8 गुण झाले आहेत. तर उर्वरित तीन सामने जिंकून 14 गुण होऊ शकतात. आरसीबीचा पुढचे तीन सामने पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सशी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला गाठणं कठीण आहे. त्यामुळे लखनौ आणि हैदराबादची कामगिरी महत्त्वाची ठरेल.लखनौ आणि हैदराबादचे प्रत्येकी 12 गुण असून चार सामने शिल्लक आहे. या दोन्ही संघ तीन सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबीला संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. त्यात मुंबईचे तीन सामने सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सशी आहेत. या तिन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली तर आरसीबीला फायदा होईल. तसेच मुंबईचे फक्त 12 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफ गाठणं शक्य नाही. त्यामुळे आरसीबी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा पुढचे तीन सामने राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि लखनौशी आहे. यात आरसीबी आणि राजस्थानसोबतचा सामना सोडून उर्वरित सामन्यात लखनौला पराभूत केलं. तर आरसीबीचा फायदा होईल. कारण सध्या दिल्लीचे 10 गुण आहेत. दोन एका सामन्यात विजय मिळवला तर 12 गुण होतील.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....