AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

X Down: संपूर्ण जग अर्धातास थांबलं, ट्विटर बंद पडलं अन…, नेमकं काय घडलं?

सोमवारी भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) सेवा अचानक ठप्प पडली. सायंकाळी ७ वाजल्यानंतर देखील युजर्सना होमपेज लोड करण्यात अडचणी आल्या.

X Down: संपूर्ण जग अर्धातास थांबलं, ट्विटर बंद पडलं अन..., नेमकं काय घडलं?
ट्वीटर डाऊन
| Updated on: Feb 16, 2026 | 9:24 PM
Share

X Down: सोमवार सायंकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हाताळणाऱ्या पदरी निराशा पडली. कारण त्यांनी जगाची खबरबात घेण्यासाठी हे आपले आवडते एप ‘X’ (आधीचे ट्विटर) उघडले तर त्यांना रिकामी स्क्रीन पाहून नैराश्य आले. १६ फेब्रुवारी २०२६ च्या सायंकाळी अचानक भारतात X.com च्या सेवा ठप्प झाली. हजारो युजर्सना कळेना की त्यांचे नेट बंद आहे की एक्स बंद पडलेय.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास युजर्सना टाईमलाईन रिफ्रेश करताना अडचणींचा सामना करावा लागला.

Downdetector तक्रारींचा पूर

आऊटेजला ट्रॅक करणारी वेबसाईट ‘Downdetector’ च्या आकड्यांवरुन कळते की ही समस्या काही छोटी नव्हती. वेबसाईटवर जारी केलेल्या ग्राफ नुसार सायं.७ वाजल्याच्या आसपास तक्रारींचा एक मोठा स्पाईक पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ७.०२ वाजल्यापासून ३,००० हून अधिक लोकांनी रिपोर्ट केले होते की त्यांना एक्स वापरण्यात अडचणी येत आहेत. हा आकडा केवळ त्या लोकांचा आहे ज्यांनी प्रत्यक्षात तक्रार दाखल केली आहे.मात्र, ज्यांना प्रत्यक्षात अडचणींचा सामना जास्त करावा लागला आहे त्यांची संख्या मोठी आहे. ग्राफमध्ये लाल रंगाची मोठी रेष सांगण्यासाठी पुरेशी आहे की हा एक मोठा सर्व्हर साईड इश्यू असू शकतो.

होमपेज गायब, टाईमलाईन झाली ब्लँक

ही समस्या केवळ मोबाईल ऐप पर्यंत मर्यादित नव्हती तर डेस्कटॉप व्हर्जनवरही हेच हाल होते. युजर्स रिपोर्ट करत होते की ते X.com उघडत असतानाच त्यांच्यासमोर एक संपूर्णपणे रिकामी स्क्रीन येत होती. आणि नंतर जुनाच फीड दिसत होता. नवीन कटेन्ट लोड होत नव्हता.

समस्या काय ?

या आऊटेजच्या मागे नक्की काय तांत्रिक कारण आहे हे समजू शकले नाही. कंपनीने यासंदर्भात काही स्पष्टीकरण जारी केलेले नाही. परंतू तासाभरानंतर पुन्हा एक्स अकाऊंट सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाल्याने युजर्सने सुटकेचा नि:श्वास सोडला.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.