Elon Musk आणू शकतात नवा स्मार्टफोन, iPhone आणि Android असणार वेगळा
अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क यांनी नवा फोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्टारलिंक ब्रँडचा हा फोन असू शकतो आणि तो iPhone आणि Android पेक्षा वेगळा असणार आहे.

टेस्ला या इलेक्ट्रीक कार कंपनीचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क यांनी आता मोबाईल क्षेत्रात उतरण्याचे संकेत दिले आहे. इलॉन मस्क यांनी असा स्मार्टफोनचा आणण्याचे सुतोवाच केले आहे जो एंड्रॉईड आणि आयफोन फोन पेक्षा वेगळा असेल. त्यांचा फोकस आर्टिफीशियल इंटेलिजन्स फिचर्ससह मॅक्सिमम परफॉर्मेंसवर असणार आहे. इलॉन मस्क हे टेस्ला , स्पेसएक्स आणि एक्सएआय सह अनेक कंपन्याचे नेतृत्व करत आहेत. आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात क्रांती आणणारा व्यक्ती म्हणून त्यांना पाहिले जात आहे.
मस्क यांनी फोन लाँच करण्याचे दिले संकेत
अलिकडे एका युजरने एक्सवर लिहिले की की ते स्टारलिंक ब्रँडचा फोन पाहू इच्छीत आहेत. स्टारलिंक मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हीस दिली आहे.ही लो-अर्थ ऑरबिटमध्ये उपस्थित हजारो सॅटेलाईट्सच्या मदतीने जगातील वेगवेगळ्या देशात हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हीटी देत आहेत. युजरच्या या प्रश्नाला उत्तर देताना काही असे संकेत दिले आहेत, ज्यावरुन अंदाज लावला जात आहे की भविष्यात इंटरनेट कनेक्शनसह स्टारलिंक यांचाही फोन बाजारात पाहायला मिळू शकतो.
कसा फोन लाँच करणार मस्क?
मस्क यांनी युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की ते या आयडिया संदर्भात ओपन आहेत. त्यांनी लिहीले की कोणत्याही वेळी असे होऊ शकते. हा सध्याच्या फोनपेक्षा खूपच वेगळा डिव्हाईस असेल. हा पूर्णपणे मॅक्सिमम परफॉर्मेंस आणि न्यूरल नेटवर्क रन करण्यासाठी ऑप्टिमाईज असेल. याचा अर्थ असा आहे की मस्क न्यूरल प्रोसेसिंग युनिट्सवाला फोन आणू शकतात, जो ऑन-डिव्हाईस टास्क रन करण्यासाठी वापरला जातो.
ऑप्टिमसला लाँच करण्यावर मस्क यांचे लक्ष
यावेळी इलॉन मस्क यांच्या टेस्लाचे ऑप्टिमस रोबोटला बाजारात उतरण्यावर लक्ष देत आहेत,यासाठी टेस्ला आता कारच्या ऐवजी रोबोटिक्सवर फोकस करणार आहेत. टेस्लाने अलिकडे त्यांच्या प्रीमीयम कार मॉडेल S आणि मॉडेल X चे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या प्लांटमध्ये या कार बनवतात, तेथे आता ऑप्टिमस रोबोटचे उत्पादन होणार आहे, मस्क यांना रोबोटकडूीन मोठी आशा आहे.
