Sunil Tatkare | गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर ‘ते’ पत्र देणार; तटकरेंची माहिती
2 वाजता राष्ट्रवादी पक्षाची विधिमंडळात बैठक होईल. जनतेची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार याचं उपमुख्यमंत्री पदासाठी निवड होणं अपेक्षित आहे. ते झाल्यावर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे अधिकृत पत्र आहे, ते देण्यासाठी या बैठकीत मुख्यमंत्र्याची भेट घेऊ आणि नंतर मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्रा पवार ह्या शपथ घेणार आहेत. यासाठी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची विधिमंडळात बैठक होणार आहे. त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी नियुक्ती केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणं टाळलं. मात्र, 2 वाजता राष्ट्रवादी पक्षाची विधिमंडळात बैठक होईल. जनतेची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार याचं उपमुख्यमंत्री पदासाठी निवड होणं अपेक्षित आहे. ते झाल्यावर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे अधिकृत पत्र आहे, ते देण्यासाठी या बैठकीत मुख्यमंत्र्याची भेट घेऊ आणि नंतर मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

