मोठी बातमी: हवेतच दोन विमानांची भीषण धडक, 5 जणांचा मृत्यू

पश्चिम फ्रान्समध्ये शनिवारी ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती.

मोठी बातमी: हवेतच दोन विमानांची भीषण धडक, 5 जणांचा मृत्यू
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Oct 11, 2020 | 10:33 AM

पॅरिस : फ्रान्समध्ये शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास (France Plane Crash) दोन विमानांची हवेतच टक्कर होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Five People Died) एका प्रवासी विमानाने मायक्रोलाइट विमानाला धडक दिल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. (two Plane Crash in france 5 people killed breaking news)

या अपघातात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते ज्याने DA40 या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात 3 जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विमानांची आग विझवण्याचा प्रयत्न सुरू अपघातानंतर मायक्रोलाईट विमान एका घराजवळ उतरलं तर दुसरं प्रवासी विमान हे एका स्थानिक ठिकाणी लँड झालं. सुदैवाने घराजवळ विमान पडल्यानंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्याता आली आहे. पण विमानात असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवेतच भीषण धडक झाल्यामुळे विमानांनी पेट घेतला.

ही आग मोठी असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतलं आहे तर पुढील तपासही सुरू आहे.

इतर बातम्या – 

मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक, राजकीय चर्चांना उधाण
‘हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील’, पायल घोषची पीएम मोदींना हाक

(two Plane Crash in france 5 people killed breaking news)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें