वर्ध्यात विलगीकरण धुडकावणाऱ्या कोरोना संशयितांची दुकानं सील

| Updated on: Mar 15, 2020 | 3:44 PM

जिल्हा प्रशासनसह आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या संशयित नागरिकांना घरी एकांतात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वर्ध्यात विलगीकरण धुडकावणाऱ्या कोरोना संशयितांची दुकानं सील
Follow us on

वर्धा : कोरोना संशयित नागरिकांना (Wardha Corona Suspects) घरात एकांतात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनेचं उल्लंघन करत त्यांनी त्यांचं दुकान उघडलं. या प्रकरणी कारवाई करत पाच नागरिकांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. हे पाच संशयित नागरिक कोरोनाबाधित देशातून आले होते. त्यामुळे त्यांना खबरदारी म्हणून घरात एकांतात राहण्याच्या सूचना (Wardha Corona Suspects) करण्यात आल्या होत्या.

जिल्हा प्रशासनसह आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या संशयित नागरिकांना घरी एकांतात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत त्यांनी दुकाने (Wardha Corona Suspects) उघडली, तसेच ते सार्वजनिक ठिकाणीही वावरताना निदर्शनास आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्या नागरिकांची दुकानं सील करण्याचे दिले आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Corona | औरंगाबादेत पहिला कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 32 वर

सध्या वर्धा जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. मात्र, परदेशातून आलेल्या 26 लोकांवर पाळत ठेवली जात आहे. यापैकी 14 जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर 12 लोकांवर आरोग्य विभागाच्या देखरेखित घरात पाळत ठेवण्यात आली आहे. सध्या एकाही संशयिताचा (Wardha Corona Suspects) अहवाल पॉझिटिव्ह नसल्याची माहिती आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 32 वर

महाराष्ट्र देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेलं राज्य ठरलं आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये कोरोनाचे 22 रुग्ण आहेत. कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशात 107 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 32 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • एकूण – 32 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या :

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, ‘इथे’ होणार रवानगी