इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, 'इथे' होणार रवानगी

इटलीमध्ये अडकलेले 211 विद्यार्थ्यांसह एकूण (Indians Retunred From Italy) 218 भारतीय मायदेशी परतले आहेत.

इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, 'इथे' होणार रवानगी

नवी दिल्ली : चीन देशानंतर कोरोना विषाणूने (Corona Virus Effect) सर्वात मोठ्या प्रमाणात इटली (Indians Retunred From Italy) हा देश प्रभावित झाला आहे. इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू पसरला आहे. याच इटलीमध्ये अडकलेले 211 विद्यार्थ्यांसह एकूण (Indians Retunred From Italy) 218 भारतीय मायदेशी परतले आहेत.

यापूर्वी रविवारी सकाळी इराणमध्ये अडकलेले 230 पेक्षा (Indians Retunred From Italy) जास्त नागरिकांना भारतात आणण्यात आलं. या सर्व प्रवाशांना एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आलं. या भारतीय नागरिकांना 14 दिवस वेगळे ठेवले जाणार आहे. त्यांना इंडो-तिबेट सीमेवरील पोलिसांच्या छावला छावणीत ठेवण्यात येणार आहे.

या सर्व नागिरकांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवलं जाणार आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी सांगितलं.

“मिलान येथून 211 विद्यार्थ्यांसह 218 भारतीय दिल्लीला (Indians Retunred From Italy) पोहोचले आहेत. या सर्वांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवलं जाईल. भारतीय जगात जिथे कुठे अडचणीत असतील, भारत सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे”, असं ट्विट मुरलीधरन यांनी केलं.

‘इटली सरकार, इटलीमधील भारतीय दल, एअर इंडिया आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार’, असंही मुरलीधरन यांनी म्हटलं.

इराणहून भारतात आलेला तिसरा गट

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना तिसऱ्यांना देशात आणण्यात आलं आहे. 44 भारतीय भाविकांना रविवारी इराणहून भारतात आणण्यात आलं. तर शुक्रवारी 58 भारतीय भाविक भारतात परतले होते.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 1,50,000 च्यावर

कोरोना विषाणूमुळे इटली, तुर्की, अमेरिका, न्युझीलंडसह जगातील अनेक देश खबरदारी आणि कठोर निर्णय घेत आहेत. आता हा जीवघेणा विषाणू वेनेजुएलापर्यंत पोहोचला आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातून कोरोनाबाधितांच्या बातम्या येत आहेत.

 भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल आणखी पाच कोरोना संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर पोहोचली (Indians Retunred From Italy) आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *