AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली दारु चोरली, वर्ध्यात चारजण ताब्यात

वर्ध्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दारुवर आता या चोरट्यांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

Lockdown : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली दारु चोरली, वर्ध्यात चारजण ताब्यात
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 12, 2020 | 3:35 PM
Share

वर्धा : जिल्ह्यात आधीच दारुबंदी, वरुन चोरुनलपून दारु (Wardha Seized Liquor Theft) आणलीच, तर जिल्ह्याच्या सीमाही बंद. जिल्ह्यात जो आतापर्यंतचा साठा होता तो देखील 21 दिवसात संपले. त्यामुळे आता दारु मिळने कठीण झालं आहे. मात्र, तलबीच करायचं तरी काय? असा प्रश्न तळीरामांना पडला असणार यात शंका नाही. पण, वर्धा शहरात दारु मिळविण्यासाठी दारुविक्री करणाऱ्या चोरट्यांनी नवीनच शक्कल लढवली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दारुवर आता या चोरट्यांनी निशाणा (Wardha Seized Liquor Theft) साधण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील आरती चौकातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या मालखान्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. रात्री चोरट्यांनी मालखान्यातून दारु लंपास करुन थेट (Wardha Seized Liquor Theft)पोलिसांनाच आव्हान दिलं. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी या चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे.

जिल्ह्यात दारुबंदीच्या यश आणि अपयशाची सर्वस्वी जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. आरती चौकात असलेल्या राज्य उत्पादन शुल्काच्या मालखान्यात रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. दारुच्या 202 बाटल्या या चोरट्यांनी चोरल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणात असलेल्या या मालखान्यातून चोरचटे पळ काढत असतांना ही बाब मालखान्याच्या चौकीदाराच्या लक्षात आली.

मालखान्यात कुणीतरी संशयास्पदरित्या प्रवेश केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानी पोलिसांना दिली. याची चाहूल या चोरट्यांना लागली. चोरी करुन बाहेर पडणारे हे चोरटे दबकले, त्यांनी लपण्यासाठी शेजारच्या भिंतीचा आडोसा घेतला. पण पोलीस हवालदाराची पडलेली नजर या चोरट्यांसाठी कर्दनकाळ ठरली. या प्रकरणी पोलिसांनी चोरी करणाऱ्या चारही जणांना अटक (Wardha Seized Liquor Theft) केली आहे.

संबंधित बातम्या :

सांगलीत संचारबंदीचे आदेश झुगारुन घरातच जुगाराचा अड्डा, 1 लाख 4 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबईत कोरोना संसर्ग पसरवल्याचा ठपका, दहा फिलीपाईन्स नागरिकांवर गुन्हा

नागपुरात पोलिसाच्या पत्नीची हत्या, मुलाच्या मित्राचा चाकूहल्ला

वसईत नाकाबंदीदरम्यान बाईकस्वाराचा उन्माद, थेट पीएसआयला उडवलं

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...