लाखो रुपये घेऊन हे कलाकार प्रचारासाठी तयार, पाहा खळबळजनक स्टिंग ऑपरेशन

लाखो रुपये घेऊन हे कलाकार प्रचारासाठी तयार, पाहा खळबळजनक स्टिंग ऑपरेशन

नवी दिल्ली : एक वेळ अशी होती, जेव्हा बॉलिवूड कलाकार राजकारणापासून दूर रहायचे. पण सोशल मीडियाच्या काळात एक नवा प्रकार समोर आलाय. सध्या टीव्ही, सोशल मीडिया या माध्यमातून कलाकार त्यांचे विचार बिनधास्तपणे मांडतात. पण ही त्यांची स्वतःची मतं नसतात. ऐकून गोंधळाल. पण कोबरा पोस्टने स्टिंगच्या माध्यमातून हा दावा केलाय. अभिनेते सरकारचं समर्थन करण्यासाठी पैसे घेत असल्याचं या स्टिंगमधून समोर आणलंय. यामध्ये सनी लिओनी, जॅकी श्रॉफ, राजू श्रीवास्तव, सुनील पाल यांच्यासह 36 जणांची नावं आहेत.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये सनी लिओनी जाहीरपणे सांगते, की तिला भाजपचा प्रचार करण्यासाठी आनंद वाटेल. मोदी सरांनी डॅनियलला (सनी लिओनीचा पती) ओव्हरसीज सिटीझन बनवलंय. आम्ही नक्की समर्थन करु, असं ती म्हणते.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ राजकीय प्रचारासाठी तिजोरीचा दरवाजा उघडण्याची मागणी करतात. जेव्हा मी माझ्या मनाचे दरवाजे उघडतोय, तर तुम्ही तुमच्या तिजोरीचा दरवाचा उघडण्यासाठी का संकोच करता? असा प्रश्न जॅकी श्रॉफने केलाय.

राजकीय प्रचारासाठी विवेक ओबेरॉय हे जरा गोंधळलेले दिसले. व्यस्त असल्याचा हवाला देत पैशांसंबंधी सर्व औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करण्यावर ते जोर देत होते.

प्ले बॅक सिंगर अभिजित भट्टाचार्यने भाजपचा प्रचार करण्यासाठी खुली ऑफर दिली. मोबाईल फोनवर व्हिडीओच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करण्यासाठी तयार असल्याचं तो म्हणाला.

स्टिंगमध्ये अंडर कव्हर रिपोर्टर जेव्हा कॉमेडियन सुनील पालजवळ पोहोचला तेव्हा पालने स्वतःच्या लोकप्रियतेविषयी सांगायला सुरुवात केली. सुनील पालशी झालेला संवाद पाहा

रिपोर्टर – मग सांगा, किती घेणार?

सुनील पाल – भाजप तर एवढा मोठा पक्ष आहे.. त्यांनी जगाकडून एवढं घेतलंय की काय सांगावं…

रिपोर्टर – अरे सर, असं जाहीरपणे बोलू नका..

सुनील पाल – हे पाहा, माझा सीन असाय, की मी 24 तास काही ना काही आयडिया देत असतो. माझं असंय की मी कुठे जातो तेव्हा ते लोक तर असतातच, पण स्थानिक केबलहूनही प्रक्षेपण होतं.. साधारणपणे 25 ते 30 लाख लोकांपर्यंत माझं म्हणणं पोहोचतं…

रिपोर्टर – याचा अर्थ भाजप…

सुनील पाल – हा.. तेच तर बोलतोय.. त्यातच मोदींचंही सांगितलं, याशिवाय कुठे उद्घाटनाला गेलो तरी एक-दोन वाक्य बोलत जाईल..

अंडरकव्हर रिपोर्टरने कॉमेडियन राजू श्रीवास्तव याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करायला सांगितलं. त्यावेळी काय घडलं ते पाहा

रिपोर्टर – ट्वीटच्या हिशोबानुसार घेता का?

राजू श्रीवास्तव – मी एका ट्वीटच्या हिशोबाने पैसा घेत नाही. ट्वीट आम्ही मोजत नाही. मी एका महिन्याच्या घेतो. 10 लाखांची एक कंपनी या प्रमाणे..

रिपोर्टर – तुम्हाला जरा बॅलन्स पण रहायचंय..

राजू श्रीवास्तव – हा ते तर मला समजलं.. थेट कुणावरही नसेल.

अंडरकव्हर रिपोर्टर कॉमेडियन राजपाल यादवकडे पोहोचला आणि आपली मागणी ठेवली तर यादव भाजपच्या समर्थनासाठी तयार झाला.

राजपाल यादव – एवढ्या चांगल्या पद्धतीने समर्थन करेन की लोक खुश होतील.

रिपोर्टर – आम्ही जे ठरवलंय त्यानुसार दोन लाख रुपये.. नऊ महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल हे ठिक आहे ना.. या हिशोबाने प्रत्येक महिन्याला 30 लाख रुपये मिळतील.

राजपाल यादव- राजपाल यादव हजारो-कोट्यवधींचं नाव आहे.. हे दोन लाखात खरेदी करु नका बे.. जर 750 कोटी लोक या जगात आहेत, तर छोट्या भावाचा सर्वे करुन घ्या.. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाम्ब्वे, पोलंड, सुरीनाम, मॉरिशिअस, हे आपला फिजी, न्यूझीलंड, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स जेवढीही.. कमीत कमी चारशे कोटी तुमच्या भावाचा चेहरा ओळखतात..

रिपोर्टर – 30 कोटींची ऑफर ठिक आहे का?

राजपाल यादव – 75 करा

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ 1

व्हिडीओ 2

व्हिडीओ 3

व्हिडीओ 4

व्हिडीओ 5

व्हिडीओ 6

 

Published On - 7:24 pm, Tue, 19 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI