Explainer : कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड का केली? काय आहे कारण?
कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड केली. अभिजीत दिपकेंनी जेल भरो आंदोलनाची घोषणा केली. जाणून मुंबई निवडण्याचे कारण

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये ‘जेल भरो आंदोलन’ सुरू केलं. या आंदोलनाला शुक्रवारी सांयकाळपासून शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 6 येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यंदा कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीऐवजी मुंबईची निवड केली. याआधी दिल्लीत जंतर-मंतरवर नीटपेपर फुटीवरून सीजेपीने आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अभिजीत दिपके यांनी मुंबईत आंदोलनाची सुरुवात विचारपूर्वक केली आहे. या आंदोलनानंतर गोवा, कोलकाता या भागातही आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करतील. ज्ञानेश कुमार जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. मुंबईची निवड करण्यामागे त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाचं कनेक्शन सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने फक्त 9 जागा जिंकल्या होत्या. यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चित्र पालटलं होतं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या होत्या. शिंदे गट 57 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेस 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 उमेदवार निवडून आले होते. दिपकेंनी याच निकालावरून मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखतो, असं म्हणत त्यांनी मुंबईची निवड केली. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगातील मतभेद असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातही फेरनिवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत 28 जागांऐवजी 9 जागांवर निवडणूक लढवली. महायुतील शिदे गटाला 7 जागा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली होती. तर काँग्रेस 13, ठाकरे गट 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या होत्या. तर एका जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यांनी विदर्भातील काही मतदारसंघाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीनेही मतचोरीचा मुद्दा उचलून धरला आहे.