CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
CJP Protest at Shivaji Park, Mumbai LIVE Coverage Updates in Mumbai : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दिपके मैदानात उतरले आहे. आज दादर येथील आंदोलनापूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

LIVE NEWS & UPDATES
-
सिंदफणा कोरडीठाक, कोरड्या दुष्काळाचे भीषण दृश्य
गेल्या वर्षी महापुराचा वेढा पडलेल्या सिंदफणा नदीकाठच्या नांदूर हवेली व हिंगणी हवेली गावांमध्ये यंदा भीषण कोरडा दुष्काळ पडला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने पिके आणि जमिनी खरडून नेल्या होत्या, तर यंदा पावसाअभावी उभी पिके जळून खाक झाली आहेत. गेल्या वर्षीच्या महापुरानंतर शासन-प्रशासनाने पाहणी करूनही शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप म्हणावी अशी मदत पडलेली नाही. ओल्या दुष्काळानंतर आता कोरड्या दुष्काळाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या या हवालदिल शेतकऱ्यांचे अश्रू सरकार पुसणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
-
भ्रष्टाचारात मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीवरही कारवाई-उच्च न्यायालय
सरकारी कर्मचारी नसला तरी सरकारी कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारात मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीवरही कारवाई करता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. खासगी व्यक्ती आरोपी असल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा लागू होत नाही, हा दावा ग्राह्य नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
-
-
दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया
सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत असताना, उजनीच्या उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पाणीगळतीबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे याचा निषेध म्हणून युवा सेनेचे अध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी ओव्हरफ्लोच्या पाण्यातच आंघोळ करत अनोखे आंदोलन केले दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना कालव्यातून पाणी वाया जात असल्याने प्रशासनाने तातडीने पाणीगळती थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे
-
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सुद्धा सहभागी झाले आहेत. आम्ही पत्रकारांसोबत असल्याचे वक्तव्य यावेळी रोहित पवार यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचा राजीनामा तसेच स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता या संदर्भात आमदार रोहित पवार यांचे विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील एस एम जोशी पुलावर कालपासून आंदोलन सुरू आहे.
-
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे CJP चे मोठे आंदोलन
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे CJP चे मोठे आंदोलन होणार आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर शिवाजी पार्क गेट नंबर ६ वर सकाळ पासूनच पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या च्या मागणीसाठी आज चार वाजता कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. पण त्यापूर्वीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
-
-
राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधी यांना आदरांजली
आज महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राजघाटावर बापूंना आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेससह भाजप आणि इतर नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
आज 2 ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करणार आहेत. त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर स्थानिकांनीही या आंदोलनाला विरोध केला आहे. या आंदोलनापूर्वीच मोठी घडामोड घडली आहे. मुंबई पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर शिवाजी पार्क गेट नंबर ६ वर सकाळ पासूनच पोलिसांचा बंदोबस्त आहे.आज चार वाजता कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. यामुळे आता आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यूपीआय व्यवहारांवर व्यापारी शुल्क लागू करण्याच्या विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज नो यूपीआय डे पुकारला आहे व्यापाऱ्यांनी युपीआय व्यवहार टाळून आंदोलनात सहभागी व्हावी असे आवाहन पुणे व्यापारी महासंघ आणि द पुना मर्चंट चेंबर या संस्थांनी केलं आहे.
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे आणि इतर उपायांना सुरूवात झाली आहे. या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द झाली आहे. तर दांडीबहाद्दर महसूली कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाती निरंक झाली आहे. तर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी अनेक ठिकाणी इच्छुकांच्या भाऊगर्दीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
Published On - Oct 02,2026 7:57 AM
