Bigg Boss 14 | खरच निक्की तांबोळी नेहा कक्कड़ची वहिनी होणार?

| Updated on: Nov 29, 2020 | 3:30 PM

बिग बॉस 14 वीकेंडवारमध्ये सलमान खानने कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे. सलमान खान म्हणाले की, 'आता फिनाले सप्ताह येणार आहे आणि त्यानंतर केवळ चार स्पर्धक घरात राहतील आणि या चार स्पर्धकांसह हा शो सुरूच राहणार आहे.

Bigg Boss 14 | खरच निक्की तांबोळी नेहा कक्कड़ची वहिनी होणार?
Follow us on

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) विकेंडवारमध्ये सलमान खानने कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे. सलमान खान म्हणाले की, ‘आता फिनाले सप्ताह येणार आहे आणि त्यानंतर केवळ चार स्पर्धक घरात राहतील आणि या चार स्पर्धकांसह हा शो सुरूच राहणार आहे. उर्वरित स्पर्धक बॅग पॅक करतील आणि आपापल्या घरी जातील.(Will Nikki Tamboli really be Neha Kakkad’s daughter-in-law?)
आज रविवारी म्हणजेच 29 नोव्हेंबरच्या भागात बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध भावंडे टोनी कक्कड़ आणि नेहा कक्कड़ येणार आहेत. यावेळी नेहा सांगते की, मी बिग बॉसच्या घरात माझ्या भावासाठी वधू शोधण्यासाठी आले आहे. जास्मीन निक्की आणि पवित्रा यांनी त्याला इम्प्रेस करावे. यावेळी निक्की टोनी कक्कड़ला जोरदार फ्लर्ट करताना दिसणार आहे. निक्कीच्या फ्लर्ट करण्याचा अंदाज बघून नेहा म्हणते, “ही माझी वहिनी तर खूपच फास्ट निघाली.
नेहा आणि टोनी त्यांच्या ‘शोना शो’ गाण्याच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये आले आहेत. बिग बॉसच्या मागील हंगामातील स्पर्धक शहनाज गिल आणि विजेता सिद्धार्थ शुक्ला यांनी या गाण्यावर परफॉर्मन्स दिले हे योगायोग आहे. नेहा कक्कड़ आणि टोनी कक्कड़ यांच्या व्यतिरिक्त चार पाहुणे बिग बॉसच्या घरात येणार आहेत.

सलमान खान घरातील सदस्यांना ‘व्हिलन’ टास्क देतो. या व्हिलनच्या खूर्चीवर घरातील सदस्य रुबीना दिलैकला बसवतात. कविता कौशिक, जास्मीन भसीन, राहुल वैद्य रूबीनावर विविध आरोप करण्यात आले. रुबीनावर करण्यात आलेल्या आरोपांवर तिने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, जास्मीन मैत्रीण म्हणत म्हणत खूप चुकीची वागली आणि त्याचे मला वाईट वाटले. फक्त एका टास्कसाठी तिने मैत्री तोडली आहे.
रुबीना नंतर जास्मीन आणि निक्की तांबोळी यांनाही ‘व्हिलन’ च्या खूर्चीवर बसवले जाते. या दोघींवर देखील विविध आरोप करण्यात येतात. सलमान खानने रुबीनाचे या आठवड्यातील कामगिरीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, या आठवड्यात ति खूपच चांगली खेळली आहे. सलमानने रूबीनाचे केलेले कौतुक पाहुण घरातील इतर सदस्यांना धक्का बसतो.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

(Will Nikki Tamboli really be Neha Kakkad’s daughter-in-law?)