Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा?

यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत.

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा?

मुंबई : यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. दरम्यान, बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणे सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु, आता ‘बिग बॉस 14’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट येत आहे. शोचा होस्ट, अभिनेता सलमान खानने ‘वीकेंड वार’मध्ये पुढच्या आठवड्यात महाअंतिम सोहळा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे घरातील सर्व सदस्यांना याचा धक्काच बसला आहे. (Salman Khan’s big bang, next week Bigg Boss 14′ grand finale)
मात्र, खरोखरच पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चे पर्व संपणार की, सलमान खानने केवळ गुगली टाकली आहे का? हे पाहण्यासारखे असणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान घरातील सदस्यांना विचारतो की, बिग बॉसची फिनाले कधी होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी निक्की तंबोली म्हणते की, जानेवारी 2021 यावर सलमान खान म्हणतो ‘बिग बॉस 14’चा फिनाले पुढील वर्षी होणार नाही तर, पुढच्या आठवड्यात होणार आहे. केवळ 4 स्पर्धक या अंतिम फेरीत जाणार आहेत.
बिग बॉसच्या घरात सध्या रुबीना दिलैक, कविता कौशिक, एजाज खान, राहुल वैद्य, निक्की तंबोली, जास्मीन भसीन, अली गोनी, अभिनव शुक्ला आणि पवित्र पुनिया हे 9 सदस्य आहेत. तर, यापैकी निक्की तंबोली आणि एजाज खान सुरक्षित आहेत. तर इतर सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत.

बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये जास्मीन आणि तिची टिम जिंकली, त्यानंतर घराच्या कर्णधारपदाची निवड करण्याची वेळ आली आहे. घराचा नवीन कर्णधार कोण बनणार हे स्पर्धकांना मिळून ठरवायचे होते. मात्र, एकमत न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. निक्की आणि राहुल या दोघांनी घराचे कर्णधार बनायचे होते.
अभिनव आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट?
अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराचे दोन भागात विभाजन, घरात पुन्हा एकदा हंगामा

(Salman Khan’s big bang, next week Bigg Boss 14′ grand finale)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI