Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस 14’ आधिकच चर्चेत आले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:00 PM, 7 Nov 2020
BIGG BOSS 14

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस 14’ आधिकच चर्चेत आले आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे. ‘बिग बॉस 14’मध्ये आता काहीतरी नवीन घडणार आहे. आगामी भाागात बिग बॉसचे घर भूत आणि देवदूतांमध्ये या दोन भागात विभागले जाणार आहे. यातूनच लक्झरी बजेट ठरणार आहे. या लक्झरी बजेट टास्कमध्ये एजाज खेळाच्या मर्यादा ओलांडताना दिसणार आहे. तो जान कुमार सानूला शौचालयात हात बुडवायला सांगणार आहे. (Bigg Boss season 14 Ghost will land in the Bigg Boss house)

या खेळामध्ये एजाज खान, निक्की तंबोली, अली गोनी सैतान होतील, तर जान कुमार सानू, रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला आणि पवित्र पुनिया देवदूत होणार आहेत. एजाज खान जानला बाथरूममध्ये घेऊन जाईल आणि जानला शौचालयातील पाण्यात हात घालायला सांगणार आहे. यावर जान एजाजच्या म्हणण्यानुसार शौचालयातील पाण्यात हात बुडवतो आणि एजाज तिथेच न थांबता पुढे म्हणतो की, माझ्या अंगावर जर हे पाणी उडले तर हात तुला मी चाटायला लावेन. तर, दुसरीकडे निक्की देखील रुबिनाला तिची आवडती वस्तू फाडण्यास सांगते. रुबिना तिची आवडती वस्तू चाकूने फाडताना दिसते.
एजाज जास्मीनवर एकतर्फी खेळ खेळत असल्याचा आरोप करतो. तर, अली जास्मीनवर ओरडताना दिसत आहे. मी तुला किती वेळ झाले आवाज देत आहे. पण तु माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहे. यामुळे आता अली आणि जास्मीनमधील मैत्रीमध्ये दुरावा येताना दिसत आहेत.
पवित्रा-एजाजमध्ये पुन्हा भांडण

पवित्रा पुनिया अजूनही एजाज खानवर रागावली आहे. पुन्हा एकदा पवित्रा आणि एजाज यांच्यात भांडण सुरू झाले आहे. या भांडणाने चक्क हाणामारीचे रूप घेतले आहे. या वादादरम्यान पवित्राने एजाजवर चहा फेकला. नॉमिनेशन टास्क दरम्यान घडलेल्या प्रकारचा राग पवित्राच्या मनात अजूनही धुमसत आहे. जास्मीनने पवित्राचा या रागाचे कारण विचारले, तेव्हा पवित्रा म्हणाली, ‘मला तुझा काही राग नाही. पण एजाजने जे माझ्यासोबत केले टे चुकीचे आहे. आणि त्यामुळेच मला राग येतोय’. या वादादरम्यान पवित्रा एजाजला सरडा म्हणाली. काही दिवसांपूर्वी घरातील सगळे स्पर्धक एजाजवर चिडलेले होते, तेव्हा एकट्या पवित्राने एजाजची बाजू घेतली होती. यांनतरही एजाज नॉमिनेशन प्रक्रियेत जास्मीनला सुरक्षित केल्याने पवित्रा चिडली आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नवी वाईल्ड कार्ड एंट्री, कॅप्टनपदासाठी पुन्हा तगडी स्पर्धा!

Bigg Boss 14 | खेळादरम्यान निक्की तंबोलीचे घृणास्पद कृत्य, चाहत्यांकडून थेट ‘स्वामी ओम’शी तुलना!

(Bigg Boss season 14 Ghost will land in the Bigg Boss house)