Bigg Boss 14 | खेळादरम्यान निक्की तंबोलीचे घृणास्पद कृत्य, चाहत्यांकडून थेट ‘स्वामी ओम’शी तुलना!

या वेळी स्पर्धकांना एकमेकांचे ऑक्सिजन मास्क लपवण्याचा टास्क देण्यात आला होता.

Bigg Boss 14 | खेळादरम्यान निक्की तंबोलीचे घृणास्पद कृत्य, चाहत्यांकडून थेट ‘स्वामी ओम’शी तुलना!

मुंबई : ‘बिग बॉस 14’चे (Bigg Boss) पर्व सध्या टीव्ही विश्वात प्रचंड गाजते आहे. रोजची भांडणे, वाद आणि कागाळ्यांनंतर आता घरात आणखी एक नवे प्रकरण घडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे पर्व चर्चेत आले आहे. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. या टास्क दरम्यान निक्की तंबोलीच्या (Nikki Tamboli) कृत्याने घरातील स्पर्धकांसह तिचे चाहतेदेखील प्रचंड नाराज झाले आहेत.(Bigg Boss 14 Latest Update Nikki Tamboli get troll for hiding mask in pant)

‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच काहीना काही विचित्र टास्क सुरू असतात. या टास्कदरम्यान स्पर्धकांच्या खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. मात्र, अनेकदा या खेळात स्पर्धक अतिशय किळसवाणे प्रकार करत असतात. नुकतेच घरात नॉमिनेशन टास्क पार पडले. या वेळी स्पर्धकांना एकमेकांचे ऑक्सिजन मास्क लपवण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी राहुलने आपले मास्क हिसकावू नये म्हणून निक्की तंबोलीने स्वतःचे मस्क चक्क पँटमध्ये लपवून ठेवले. इतकेच नाही तर, मास्क हिसकावून दाखव, असे म्हणत राहुलला डिवचले. निक्कीच्या (Nikki Tamboli) या घाणेरड्या कृत्याने घरातले इतर स्पर्धक चांगलेच वैतागले.

चाहत्यांनी केली स्वामी ओमशी तुलना

बिग बॉसच्या (Bigg Boss) मागील एका पर्वात स्वामी ओम या स्पर्धकानेही असे घृणास्पद कृत्य केले होते. स्वामी ओमने स्वतःचे मुत्र एका भांड्यात जमा करून ते घरातील इतर स्पर्धकांवर फेकले होते. निक्कीच्या या कृत्यानंतर घरातल्या सर्वांना स्वामी ओमची आठवण आली आहे. अनेकांनी स्वामी ओमशी तिची तुलना करत तिला ट्रोल केले आहे. (Bigg Boss 14 Latest Update Nikki Tamboli get troll for hiding mask in pant)

(Bigg Boss 14 Latest Update Nikki Tamboli get troll for hiding mask in pant)

‘चंद्रमुखी’ बेघर

रेड झोनमध्ये असलेली स्पर्धेक कविता कौशिक आणि निशांत सिंह मलकानी बेघर झाले आहेत. कविता कौशिक बेघर करण्याचा निर्णय प्रेक्षकांचा होता. तर, निशांत मलकानीला बेघर करण्याचा निर्णय बिग बॉसच्या ग्रीन झोनमधील घरातील इतर सदस्यांचा होता.

वाइल्ड कार्डवर एंट्री करून कविता कौशिक कॅप्टन झाली होती. त्यानंतर कविता कौशिक हीने देखील बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केले होते.कविता कौशिक संपूर्ण भागात नाराज दिसत होती. भागाच्या सुरूवातीलाच बेजबाबदार असल्याचा ठप्पा तिच्यावर घरातील सहा जणांनी ठेवला होता. घरामध्ये आल्या-आल्याच तिचे एजाज खानसोबत झालेले भांडण, त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

(Bigg Boss 14 Latest Update Nikki Tamboli get troll for hiding mask in pant)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI