AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक बिग बॉसच्या घराबाहेर

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण,आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासुन बिग बॉसवरही गंभीर आरोप केले जात होते.

Bigg Boss 14 | ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक बिग बॉसच्या घराबाहेर
| Updated on: Nov 03, 2020 | 5:03 PM
Share

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण,आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासुन बिग बॉसवरही गंभीर आरोप केले जात होते. त्यामुळे बिग बॉस 14 आधिकच चर्चेत आले होते. आता या आठवड्यात घरातील दोन सदस्य बेघर झाले आहेत. टीव्हीची ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) घरातून बेघर झाली आहे. तिच्यासोबतच घरातील आणखीन एक सदस्य बेघर झाला आहे. (Actress Kavita Kaushik Out From Bigg Boss House)

रेड झोनमध्ये असलेली स्पर्धेक कविता कौशिक आणि निशांत सिंह मलकानी बेघर झाले आहेत. कविता कौशिक बेघर करण्याचा निर्णय प्रेक्षकांचा होता. तर, निशांत मलकानीला बेघर करण्याचा निर्णय बिग बॉसच्या ग्रीन झोनमधील घरातील इतर सदस्यांचा होता.कविता कौशिक बिग बॉसच्या घरातून जाताना घरातील इतर सर्व सदस्यांना भेटली फक्त एजाज खानला भेटली नाही. कविता कौशिक घराच्या दरवाज्याजवळ गेली त्यावेळी दरवाजा उघडला.

त्यावेळी एजाज खान कविताच्या दिशेने आवाज देत गेला होता. मात्र, त्याचा आवाज ऐकूनही कविता कौशिकने मागे वळूनही पाहिले नाही. ती सरळ गेली. त्यानंतर एजाज खान खूप दु:खी दिसत होता. एजाज म्हणाला की, तिने मला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणले होते. आणि ती जाताना मला बोलली देखील नाही, चुक माझीच आहे म्हणत तो स्वत:ला दोष देत होता. मध्यंतरी कविता कौशिक आणि एजाज खानमध्ये पॅचअप झाले होते. मात्र बेघर झाल्यानंतर ती एजाज खानशी न बोलता गेल्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनही वाद असल्याचे दिसले.

वाइल्ड कार्डवर एंट्री करून कविता कौशिक कॅप्टन झाली होती. त्यानंतर कविता कौशिक हीने देखील बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केले होते.कविता कौशिक संपूर्ण भागात नाराज दिसत होती. भागाच्या सुरूवातीलाच बेजबाबदार असल्याचा ठप्पा तिच्यावर घरातील सहा जणांनी ठेवला होता. घरामध्ये आल्या-आल्याच तिचे एजाज खानसोबत झालेले भांडण, त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

कविता कौशिकचे म्हणणे होते की, मी एजाज खानची अनेक वेळा मदत केली, त्यांच्यासोबत मस्करी केली. पण, बिग बॉसने ते सर्व काही दाखवले नाहीतर, फक्त मी त्याच्याशी केलेले भांडणच दाखवले. माझ्या चांगला गोष्टी बिग बॉस दाखवत नाहीत, किंवा त्यावर चर्चा करत नाहीत. माझ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच दाखवल्या जातात. माझी चांगली बाजूच दाखवलीच जात नाही. बिग बॉस निक्की तंबोली, पवित्रा आणि इजाज खान यांनाच चांगले दाखवतात. ते घरात चुकीचे वागतात, यावर चर्चा कधीच केली जात नाही. असा आरोप कविता कौशिकने बिग बॉसवर केले होते.

 संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | घरात एकच व्यक्ती ‘टार्गेट’ होतेय, रुबिना दिलैकच्या चाहत्यांची तीव्र नाराजी

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात पवित्रा पुनियाच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा!

(Actress Kavita Kaushik Out From Bigg Boss House)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.