वाशीत लॉजमध्ये रक्ताचा पाट, अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं!

नवी मुंबई : वाशी जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या झाली. लॉजमध्ये महिलेचा गळा चिरल्याने संपूर्ण रुमभर रक्त पसरलं होतं. तसेच, महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. ही घटना रविवरी संध्याकाळी संकल्प लॉजमध्ये घडली. मंदा सुखडारे (वय 40 वर्षे) असे महिलेचं नाव आहे, तर अशोक दळवी (वय 45 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी […]

वाशीत लॉजमध्ये रक्ताचा पाट, अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

नवी मुंबई : वाशी जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या झाली. लॉजमध्ये महिलेचा गळा चिरल्याने संपूर्ण रुमभर रक्त पसरलं होतं. तसेच, महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. ही घटना रविवरी संध्याकाळी संकल्प लॉजमध्ये घडली. मंदा सुखडारे (वय 40 वर्षे) असे महिलेचं नाव आहे, तर अशोक दळवी (वय 45 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. हत्या का झाली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. वाशी पोलिस या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकी घटना काय घडली?

वाशी येथील लॉजमध्ये काल संध्याकाळी महिला आणि तिच्यासोबत आलेली व्यक्ती हे दोघेही 4 वाजून 20 मिनिटांनी लॉजमध्ये दाखल झाले होते. तिसऱ्या मजल्यावरील 306 क्रमांकाची खोली त्यांनी घेतली. मात्र काही वेळाने महिलेबरोबर आलेली व्यक्ती घाई-घाईने निघून गेली. यामुळे लॉज चालकांना त्याचा संशय आला. म्हणून त्याची तपासणी करण्यासाठी रूम मध्ये गेले असता, ती महिला अर्धनग्न मृत अवस्थेत बेडवर पडली होती आणि पूर्ण रक्त रुममध्ये पसरले होते.

यावेळी लॉज चालकांनी त्वरीत वाशी पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचे नाव अशोक दळवी (45) आहे. तर मृत महिलेचे नाव मंदा सुखडारे (40) उर्फ उमा असे आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वाशी पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

मृत महिला मुंबईमधील विलेपार्ले पश्चिमेकडील नेहरूनगर येथील रहिवासी आहे. सदर महिला आणि फरार आरोपी या लॉजमध्ये  येत होते. अशी लॉजमधील रजिस्टरमध्ये नोंद आहे, असं वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.