Maharashtra Political News live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका

| Updated on: Apr 29, 2024 | 9:03 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 29 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका

पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने महायुतीनेही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर मोदी यांचा पुण्यात राजभवन येथे मुक्काम असेल. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत आज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ठाणे, धुळे आणि वर्धा या जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. 50 ते 60 शेतकऱ्यांचा राहती घरं संपादित करण्यास विरोध आहे. सुनावणी न करता सर्व्हे करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2024 09:03 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांची नाव न घेता शरद पवार यांच्यावर सडकून टीका

    पुणे : “आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विपक्ष सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात. ते आपल्या पक्षातही असंच काहीसं करतात. या आत्मा कुटुंबातही तसंच करतात”, अशी टीका नरेंद्र मोदींनी पुण्यातील प्रचारसभेत केली. विशेष म्हणजे यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा होते.

  • 29 Apr 2024 06:14 PM (IST)

    वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह ‘रोड रोलर’

    पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. वसंत मोरे यांचं अधिकृत चिन्ह आता रोड रोलर हे असाणार आहे.

  • 29 Apr 2024 04:52 PM (IST)

    2024 च्या निवडणुका भारताचे भवितव्य ठरवतील - पीएम मोदी

    निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 2024 च्या निवडणुका भारताचे भविष्य ठरवतील. ही निवडणूक विकसित भारतासाठी संकल्पाची निवडणूक आहे. ही निवडणूक स्वावलंबी भारताच्या कर्तृत्वाची निवडणूक आहे. येत्या काही वर्षांत भारत ही जगातील टॉप 3 अर्थव्यवस्था बनली पाहिजे हा आमचा संकल्प आहे. सुट्टी साजरी करणारे हे संकल्प पूर्ण करू शकत नाहीत.

  • 29 Apr 2024 04:35 PM (IST)

    कल्पना सोरेन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान मुख्यमंत्री चंपाई सोरेनही उपस्थित होते.

  • 29 Apr 2024 04:25 PM (IST)

    मोदींना पंतप्रधान करणे म्हणजे बिहारमधील 'जातीयवाद' संपवणे - शाह

    झांझारपूर, मधुबनी, बिहार येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणे म्हणजे बिहारमधील 'जातीवाद' संपवणे आणि गुणवत्तेवर आधारित राजकारण सुरू करणे.

  • 29 Apr 2024 04:08 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींविरोधातील याचिका फेटाळली

    पंतप्रधान मोदींना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. या याचिकेत योग्यता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत सध्याची रिट याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.

  • 29 Apr 2024 02:57 PM (IST)

    काँग्रेसने कलम 370 लावून आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला

    काँग्रेसने 370 लावून आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला. मात्र मोदी सरकारने 370 कलम हटवून संविधान कश्मीरमध्ये लागू केले.

  • 29 Apr 2024 02:56 PM (IST)

    गोव्यातील दाबोलिम विमानतळ उडवून देण्याची धमकी

    गोव्यातील दाबोलिम विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर विमानतळावर सुरक्षा वाढवली गेली आहे. गोवा विमानतळ हे लष्कराच्या अखत्यारीत येते. ई-मेल बाबत गोवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • 29 Apr 2024 01:57 PM (IST)

    रोहिणी खडसे यांचा भाजपवर निशाणा

    'मुंगेरीलाल के हसीन सपने' असाच हा 400 पारचा नारा भाजपचा राहणार आहे. कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल.  त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल. आपकी बार 400 के पार भाजपच्या या घोषणेवरून राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 29 Apr 2024 01:45 PM (IST)

    पियुष गोयल उद्या सकाळी अर्ज दाखल करणार

    लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. एक महिन्यात पियुष गोयल यांच्या माध्यमातून उमेदवार म्हणून विधानसभेचे सहाही मतदार संघ आणि 42 वाॅर्ड कव्हर केले आहेत.

  • 29 Apr 2024 01:30 PM (IST)

    नरेंद्र मोदी आज पुण्यात मुक्कामी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात राजभवनला मुक्कामी असणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवन बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. राजभवनच्या गेटवर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींची उद्या धाराशिव आणि माळशिरसमध्ये जाहीर सभा आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत.
  • 29 Apr 2024 01:15 PM (IST)

    सुभाष भामरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी 'ते' नेते उपस्थित

    माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिगावकर हे भाजपवर नाराज होते. त्यांची नाराजी आता दूर झाली आहे. सुभाष भामरे यांचा अर्ज भरण्यासाठी प्रतापराव दिगावकर उपस्थित आहेत. नाराज गटाचे बिंदू माधव शर्मा देखील उपस्थित आहेत.

  • 29 Apr 2024 12:08 PM (IST)

    धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांच्या उमेदवारी रॅलीला सुरुवात

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार रॅलीला सुरुवात. उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत जिवंत देखावे डीजे, पारंपारिक वाद्यांचा समावेश..

  • 29 Apr 2024 11:50 AM (IST)

    खुर्चीच्या मोहामुळे ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले- एकनाथ शिंदे

    खुर्चीच्या मोहामुळे ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. घरी बसून, फेसबुक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का? ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये घात केला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  • 29 Apr 2024 11:40 AM (IST)

    राजाभाऊ वाजे यांनी मुहूर्तावर दाखल केला उमेदवारी अर्ज

    नाशिक- राजाभाऊ वाजे यांनी मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या शक्ती प्रदर्शनानंतर महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.

  • 29 Apr 2024 11:30 AM (IST)

    शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना गावकऱ्यांकडून आर्थिक

    धाराशिव लोकसभेसाठी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली. बार्शी तालुक्यातील आगळगाव आणि उंबरगे या दोन गावातील नागरिकांनी 72 हजार रुपये जमा करुन दिले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचं सांगत ओमराजे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

  • 29 Apr 2024 11:20 AM (IST)

    राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला

    सोलापूर- राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणीस यांना भेटण्यासाठी बालाजी सरोवर येथे दाखल झाले आहेत.

  • 29 Apr 2024 11:10 AM (IST)

    नाशिक- मविआ उमेदवार राजाभाऊ वाजे भरणार उमेदवारी अर्ज

    नाशिक- मविआ उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. अर्ज भरताना वाजे यांच्यासोबत संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

  • 29 Apr 2024 10:57 AM (IST)

    Live Update | महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आपल्या उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करणार...

    महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आपल्या उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करणार.. मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार... धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत करणार शक्ती प्रदर्शन... मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत...

  • 29 Apr 2024 10:40 AM (IST)

    Live Update | अमरावती मध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी...

    अमरावती मध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी...अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा... अवकाळी पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड गावात घरांचे नुकसान.. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान..

  • 29 Apr 2024 10:25 AM (IST)

    Live Update | मोदींची लाट कमी झाली आहे - रवींद्र धंगेकर

    मोदींच्या सभेला पुणेकर उत्तर देतील... राहुल गांधी यांची ३ तारखेला पुण्यात सभा आहे त्या सभेत राहुल गांधी बोलतील... मात्र काळा पैसा आला का ? खात्यावर १५ लाख आले का ? आयुष्यमान भारतचे कार्ड पण आले नाहीत... पुणेकरांना माहिती आहे की पुणेकरांचा कार्यकर्ता कोण आहे... त्यामुळे पुणेकर मला नक्की विजयी करतील आणि पुण्यात पुणेकर पॅटर्न चालेल... असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे.

  • 29 Apr 2024 10:09 AM (IST)

    Live Update | महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम

    महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम... नाशिकसाठी 2 महंत आज उमेदवारी अर्ज भरणार... नाशिकसाठी 2 महंत आज उमेदवारी अर्ज भरणार... नाशिकमध्ये शांतिगीरी महाराजांचं शक्तिप्रदर्शन

  • 29 Apr 2024 09:55 AM (IST)

    Maharashtra News : मावळ, मुळशीमधील धरणातील पाणीपातळी खालावली

    वाढत्या उन्हाच्या तडाख्याने मावळ, मुळशीमधील धरणातील पाणीपातळी खालावली. पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन. मावळ आणि मुळशी तालुक्यातील धरणांची पाणी पातळी तापमानाचा पारा वाढल्याने बाष्पीभवन होऊन खालावत चालली आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील 44 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची पाणी पातळी 34.96 टक्क्यांवर आली असून हा पाणी साठा जुलै अखेरीस पुरेल इतका आहे. मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

  • 29 Apr 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News : मोदींना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी कोर्टात याचिका

    पंतप्रधान मोदींना निवडणूक लढविण्यावर बंदी घाला, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल. याचिकेवर आज सुनावणी. प्रचारात मोदींनी देव आणि पूजा स्थळ यांचा उल्लेख करुन मत मागितली. त्यामुळं मोदींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी याचिका. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मोदींनी धार्मिक मुद्द्यांवर मत मागितल्याचा आरोप.

  • 29 Apr 2024 09:43 AM (IST)

    Maharashtra News : अमरावतीमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

    अमरावतीमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा. अवकाळी पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड गावात घरांचे नुकसान. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान.

  • 29 Apr 2024 09:13 AM (IST)

    Maharashtra News : हिरव्या मिरचीची दिल्ली येथून आवक

    पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात हिरव्या मिरचीची दिल्ली येथून आवक झाली आहे. मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला 65 रुपये बाजारभाव मिळत आहे तर मागील आठवड्यापेक्षा मिरचीच्या बाजारभावात 30 रुपयांची वाढ झाली.

  • 29 Apr 2024 08:53 AM (IST)

    शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, वाई आणि फलटणमध्ये होणार सभा

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून वाई आणि फलटण मध्ये त्यांची सभा होणार आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवारासाठी शरद पवार हे सभा घेणार आहेत.  थोड्याच वेळात शरद पवार त्यांच्या पुण्यातील कार्यालयात येणार. कार्यालयात आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन शरद पवार साताऱ्याच्या दिशेने होणार रवाना.

  • 29 Apr 2024 08:39 AM (IST)

    अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील शूटर्सना आज कोर्टात करणार हजर

    अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटर्सना गुन्हे शाखा आज कोर्टात हजर करणार आहे.  विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना मोक्का कोर्टात हजर केलं जाणार आहे. गुन्ह्याला मोक्का लावल्याने आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडीचा मार्ग मोकळा झाला आहे.  मोक्का कायद्यात आरोपींच्या ३० दिवसांच्या पोलीस कोठडीची तरतूद आहे .

  • 29 Apr 2024 08:14 AM (IST)

    सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

    सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात येणार असून होम मैदानावर दुपारी दीड वाजता सभा होणार आहे. सभेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

  • 29 Apr 2024 08:08 AM (IST)

    1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा - राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन

    1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे.  1 मे रोजी राज ठाकरे हे हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. सर्व विभागातून मनसैनकांना हुताम्हा चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आलंआहे.

  • 29 Apr 2024 08:00 AM (IST)

    गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचं ड्रग्स पकडलं

    गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचं ड्रग्स पकडण्यात आलं आहे. पाकिस्तानी बोटीवर 600 कोटी रुपये किमतीचं 86 किलो ड्रग्स सापडलं. तटरक्षक दल,एटीएस आणि एनसीबीची मोठी कारवाई. 14 पाकिस्तानी तस्करांना एटीएसने ताब्यात घेतलं.

  • 29 Apr 2024 07:59 AM (IST)

    राज्यात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

    दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ठाणे, धुळे आणि वर्धा या जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

Published On - Apr 29,2024 7:59 AM

Follow us
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....