AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्ट देशांची यादी जाहीर, भारत 78 व्या स्थानी, पाकिस्तान-चीन कितव्या स्थानी?

नवी दिल्ली: जगातील भ्रष्ट देशांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकल्यानंतर, भारताची स्थिती सुधारल्याचं दिसतं. 180 देशांच्या यादीत भारताने तीन पायऱ्यांनी सुधारणा करत 78 वं स्थान मिळवलं आहे. भारतापेक्षा रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 102 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सोमालिया हा जगातील सर्वात भ्रष्ट देश आहे. भ्रष्टाचारविरोधी मूल्यांकन संस्थेने जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन […]

भ्रष्ट देशांची यादी जाहीर, भारत 78 व्या स्थानी, पाकिस्तान-चीन कितव्या स्थानी?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली: जगातील भ्रष्ट देशांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकल्यानंतर, भारताची स्थिती सुधारल्याचं दिसतं. 180 देशांच्या यादीत भारताने तीन पायऱ्यांनी सुधारणा करत 78 वं स्थान मिळवलं आहे. भारतापेक्षा रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 102 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सोमालिया हा जगातील सर्वात भ्रष्ट देश आहे.

भ्रष्टाचारविरोधी मूल्यांकन संस्थेने जागतिक भ्रष्टाचार मूल्यांकन यादी 2018 जारी केली. या यादीत जगातील 180 देशांची नावं आहेत. पहिल्या स्थानी डेन्मार्क आहे, म्हणजेच या देशात भ्रष्टाचाराचं प्रमाण नगण्य किंवा कमी आहे. याच यादीत भारत 78 व्या क्रमांकावर असल्याने, भारतातील भ्रष्टाचाराबाबत अंदाज लावता येऊ शकतो. यापूर्वी 2017 मध्ये भारत या यादीत 81 व्या नंबरवर होता. म्हणजेच वर्षभरात थोडा का होऊन भ्रष्टाचार कमी झाल्याचं दिसून येतंय. पण ही सुधारणा अत्यंत कासवगतीची आहे. 2017 मध्ये भारताला 40 गुण मिळाले होते. यंदा त्यात एका अंकाची भर होऊन 41 गुण मिळाले.

चीन आणि पाकिस्तानची परिस्थिती गंभीर भारताचं रँकिंग सुधारत असताना, चीन आणि पाकिस्तानची परिस्थिती मात्र गंभीर आहे. कारण भ्रष्ट देशांच्या या यादीत चीन 87 व्या स्थानी आहे. तर पाकिस्तान थोड्या थोडक्या नव्हे तर 117 व्या स्थानी आहे.

सोमालिया सर्वात भ्रष्ट भ्रष्ट देशांच्या यादीत सोमालिया सर्वात अव्वल आहे. सोमालिया भ्रष्टाचाराने बोकाळल्याचं चित्र आहे. तर डेन्मार्कमध्ये भ्रष्टाचार कमी प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे. डेन्मार्कनंतर न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर, स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांचा नंबर लागतो. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वात अमेरिकेची स्थिती बिघडत आहे. कारण या यादीत टॉप 20 देशांमध्ये असलेली अमेरिका आता 22 व्या स्थानी घसरलेली आहे. 2011 नंतर अमेरिका पहिल्यांदाच टॉप 20 देशांमधून बाहेर पडली आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण