AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅनेजरने वेश्या म्हटलं, झरीन खानची पोलिसात धाव

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली अभिनेत्री झरीन खान सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. झरीनने तिच्या एक्स मॅनेजर अंजली अथविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पैशांच्या कारणावरून अंजली अथने झरीनशी अपमानास्पद वागणूक केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं झरीनने या तक्रारीत म्हटलं आहे. झरीनने आपल्या वकिलासोबत गुरुवारी मुंबईतील खार […]

मॅनेजरने वेश्या म्हटलं, झरीन खानची पोलिसात धाव
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली अभिनेत्री झरीन खान सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. झरीनने तिच्या एक्स मॅनेजर अंजली अथविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पैशांच्या कारणावरून अंजली अथने झरीनशी अपमानास्पद वागणूक केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं झरीनने या तक्रारीत म्हटलं आहे. झरीनने आपल्या वकिलासोबत गुरुवारी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात अंजली अथ विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल करत, या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

अंजली अथ ही 3 ते 4 महिने झरीनची मॅनेजर होती, झरीनसाठी काम करत असताना दोघींमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर दोघींनी एकमेकींना याबाबत अनेक मेसेजही केले. याच दरम्यान अंजलीने झरीनला वादग्रस्त मेसेज करत तिला वेश्या म्हटले, असे झरीनने तक्रारीत सांगितले. दरम्यान झरीनने पोलिसांना नेमके काय पुरावे दिले याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

झरीनने 2010 साली आलेल्या वीर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत होती, मात्र हा चित्रपट फार काही चालला नाही. त्यानंतर झरीन खानने हाऊसफुल्ल-2, अक्सर-2, हेट स्टोरी-3, 1921, वजह तुम हो इत्यादी चित्रपटांत काम केले आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...