लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी

दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही.

लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 4:13 PM

मुंबई : दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही. कारण लवकरच फूड डिलिव्हर कंपनी झोमॅटो घरोघरी दारु पोच करणार आहे, असा निर्णय झोमॅटोने घेतला आहे. लॉकडाऊनदरम्यान दारुची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे झोमॅटोने दारुची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं (Zomato alcohol delivery during lockdown) आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर दारुप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी दारुप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

लॉकडाऊनमुळे दारुच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संधीचा फायदा घेत दारुवर 70 टक्के विशेष कोरोना टॅक्स लावला आहे. आता झोमॅटोही या संधीचा फायदा घेत आहे.

सध्या भारतात दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणताही कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात दारु पिण्यासाठीवेगळा कायदा आहे. पण घरपोच दारु संबंधित राज्य सरकारने कायदा करावा, असं मत उद्योग संघटना इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसीएशन ऑफ इंडिया (ISWAI) च्या संबंधित सदस्यांनी मांडले आहे.

“सरकारने राज्याला घरोघरी दारु पोच करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनमध्ये राज्यातील महसूल वाढेल”, असं मत ISWAI चे कार्यकारी अध्यक्ष अमृत सिंह यांनी व्यक्त केले.

“जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारुची डिलिव्हरी केली जाऊ शकते. तर दारु विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी आम्ही दारु घरपोच देण्याचा विचार करत आहे”, असं झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत घरपोच दारु, ऑनलाईन मद्य विक्रीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश

हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.