70 वर्षांची महिला तिशीच्या मुलीसारखी फिट! तिच्यासारखा फिटनेस हवा? आतापासूनच करा या 5 गोष्टी

वयाच्या ७०व्या वर्षीही दमदार फिटनेस आणि अॅक्टिव्ह जीवनशैली जपणाऱ्या कॅरी सिसन यांच्या काही सवयी सध्या चर्चेत आहेत. वाढत्या वयातही शरीर मजबूत आणि अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी त्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर देतात. तुम्हालाही वाढत्या वयात फिट आणि निरोगी राहायचं असेल, तर त्यांच्या या ५ टिप्स नक्की फॉलो करा.

70 वर्षांची महिला तिशीच्या मुलीसारखी फिट! तिच्यासारखा फिटनेस हवा? आतापासूनच करा या 5 गोष्टी
carrie sisson
Image Credit source: instagram
| Edited By: | Updated on: Sep 24, 2026 | 1:06 PM

वयाची साठी ओलांडल्यानंतर शरीराची ताकद कमी होणे, स्नायू कमजोर होणे आणि सतत थकवा जाणवणे स्वाभाविक मानलं जातं. मात्र, वयाच्या ७०व्या वर्षीही दमदार शरीरयष्टी आणि सक्रिय जीवनशैली जपणाऱ्या कॅरी सिसन यांच्याकडे पाहिलं तर ही धारणा नक्कीच बदलते. फिटनेस कंटेंट क्रिएटर आणि पेलुवा याच्या क्लोदिंग डिझायनर असलेल्या कॅरी यांनी २८ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांचे मजबूत खांदे, बायसेप्स आणि अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत.

वाढत्या वयातही शरीराची ताकद आणि फिटनेस कसा टिकवून ठेवायचा, याचा ‘ब्लूप्रिंट’ त्यांनी या पोस्टमधून सांगितला आहे. त्यांच्या मते, फिटनेसचा अर्थ केवळ वजन कमी करणं किंवा कॅलरी बर्न करणं नसून, दैनंदिन आयुष्यातील हालचाली सहज करता येतील इतकं शरीर सक्षम ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्हालाही वय वाढल्यानंतर फिट आणि उत्साही राहायचं असेल, तर कॅरी यांच्या या ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

वजन कमी करण्यापेक्षा ताकदीवर लक्ष द्या

फिटनेस म्हणजे केवळ वजन कमी करणं किंवा कमी कॅलरी खाणं नाही. शरीराचं वजन किती आहे यापेक्षा तुम्ही किती वजन सहज उचलू शकता, याला अधिक महत्त्व द्यायला हवं, असं कॅरी सांगतात. शरीराची कार्यक्षम ताकद वाढवणं भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.

स्नायू मजबूत करण्यावर भर द्या

कॅरी यांच्या मते, वाढत्या वयासाठी स्नायू म्हणजे एक प्रकारची ‘इन्शुरन्स पॉलिसी’ आहे. त्यामुळे स्नायूंची ताकद आणि घनता टिकवण्यासाठी नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं महत्त्वाचं आहे.

केवळ कार्डिओवर अवलंबून राहू नका

व्यायाम करताना फक्त कॅलरी बर्न करण्यावर लक्ष केंद्रित करू नका. हृदयाची गती वाढवणारे कार्डिओ व्यायाम महत्त्वाचे असले तरी स्ट्रेंथ ट्रेनिंगला वर्कआउट रुटीनमध्ये प्राधान्य द्यावं. किराणा सामान उचलणं, जमिनीवरून सहज उठणं, जिने चढणं किंवा नातवंडांना उचलणं यांसारख्या दैनंदिन गोष्टी सहज करता येणं हे फिटनेसचं महत्त्वाचं उद्दिष्ट असावं.

वयाच्या चौकटीत स्वतःला अडकवू नका

‘माझं वय झालंय’ म्हणून आवडीच्या गोष्टी करण्यावर मर्यादा घालू नका. आपल्या आवडीचे कपडे घाला, नवीन गोष्टी करून पाहा आणि वयाबद्दल समाजाने ठरवलेल्या अपेक्षांमध्ये स्वतःला अडकवू नका, असा कॅरी यांचा सल्ला आहे.

मानसिक आरोग्याची काळजी घ्या

आपण शरीरासाठी काय करतो, याइतकंच आपण मनाला काय देतो हेही तितकचं महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूचे लोक, विचार आणि आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देतो त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक वातावरण आणि मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us